एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 44 लाखांवर, 16.50 लाखांहून अधिक रुग्ण बरे
जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 44 लाखांच्या वर गेला आहे.
मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 44 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. तर कोरोनामुळं गेलेल्या बळींची संख्या दोन लाख 97 हजारांवर गेली आहे. मागील 24 तासात 88,202 नवीन कोरोना केसेस समोर आल्या असून 24 तासात 5314 लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 97 हजार 765 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 16 लाख 57 हजार 716 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 72 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 32 लाखांजवळ कोरोना रुग्ण आहेत.
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात बाराव्या स्थानावर आहे. भारतात आत्ता कोविडचे 78,055 रुग्ण आहेत. तर भारतात कोरोनामुळं 2551 बळी गेले आहेत.
Coronavirus | कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ, संसर्ग वाढणं चिंतेची बाब : WHO
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,430,348 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 85,197 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 33,186 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 229,705 इतकी आहे. स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,104 लोकांचा मृत्यू झालाय. 271,095 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 31,106 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 222,104 इतका आहे.
- अमेरिका: कोरोनाबाधित - 1,430,348, मृत्यू- 85,197
- स्पेन: कोरोनाबाधित - 271,095, मृत्यू- 27,104
- रशिया: कोरोनाबाधित - 242,271, मृत्यू- 2,212
- यूके: कोरोनाबाधित - 229,705, मृत्यू- 33,186
- इटली: कोरोनाबाधित - 222,104, मृत्यू- 31,106
- ब्राझिल: कोरोनाबाधित - 189,157, मृत्यू- 13,158
- फ्रांस: कोरोनाबाधित - 178,060, मृत्यू- 27,074
- जर्मनी: कोरोनाबाधित - 174,098, मृत्यू- 7,861
- टर्की: कोरोनाबाधित - 143,114, मृत्यू- 3,952
- इरान: कोरोनाबाधित - 112,725, मृत्यू- 6,783
- चीन: कोरोनाबाधित - 82,926, मृत्यू- 4,633
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौदाव्या स्थानावर भारतात आत्ता कोविडचे 67 हजार 161 रुग्ण तर 2212 बळी कोरोनामुळं गेले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement