Corona Virus | डायमंड प्रिंसेस क्रूजवर अडकलेले भारतीय प्रवासी चार्टर्ड विमानाने परतणार मायदेशी
टोकीयो जवळील योकोहामा बेटावर तीन फेब्रुवारीला उभं करण्यात आलेल्या डायमंड प्रिंसेस क्रूझवर एकून 3,711 लोकांमध्ये 138 भारतीयांचाही समावेश होता. यांमध्ये क्रूजवरील कर्मचाऱ्यांपैकी 132 सदस्य आणि सहा प्रवाशांचा समावेश आहे.
टोकियो : जपानमध्ये योकोहामा बेटावर उभ्या असलेल्या क्रूज डायमंड प्रिंसेसमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले होते. या क्रूजवर 130 हून अधिक भारतीय देखील अडकले आहेत. या क्रूजवरील इतर भारतीयांची कोरोनाची तपासणी करण्यात आली असता, ती नेगेटिव्ह आली. आज एका चार्टर्ड विमानातून त्यांना भारतात आणलं जाणार आहे. भारतीय दुतावासाने मंगळवारी ही माहिती दिली. या बोटीवरील 16 भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे.
टोकीयो जवळील योकोहामा बेटावर तीन फेब्रुवारीला उभं करण्यात आलेल्या डायमंड प्रिंसेस क्रूझवर एकून 3,711 लोकांमध्ये 138 भारतीयांचाही समावेश होता. यांमध्ये क्रूजवरील कर्मचाऱ्यांपैकी 132 सदस्य आणि सहा प्रवाशांचा समावेश आहे. भारतीय दुतावासाने मंगळवारी ट्वीट केलं 'ज्या भारतीयांची सीओव्हीआयडी-19 टेस्ट नेगेटिव्ह आली, त्यांना आरोग्य दलाच्या परवानगीनंतर मायदेशी आणण्यासाठी विमानाची व्यवस्था करण्यात येणार आहे.'
ट्वीटमध्ये सांगण्यात आलं आहे की, 'या संदर्भात एक ई-मेल केला आहे. 5 फेब्रुवारीपासून जपानमधील योकोहामा बेटावर डायमंड प्रिंसेस क्रूझ उभी आहे. या शिपमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले लोक उपस्थित आहेत.
पाहा व्हिडीओ : जगभरात कोरोनाचा हाहाकार, देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम
दरम्यान, चीनमध्ये घातक कोरोना व्हायरसने आणखी 71 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा 2,663 वर पोहोचला आहे. तर 77,658 पेक्षा अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यादरम्यान, विश्व स्वास्थ संस्थेच्या (WHO)तज्ञांनी चीनमधील हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या वुहान शहराचा दौरा केला.
भारताने आपल्या नागरिकांना चीनमधून मायदेशी आणलं
भारताने विशेष विमान पाठवून 647 भारतीय नागरिक आणि मालदिवच्या सात नागरिकांना चीनमधून मायदेशी आणलं आहे. अजूनही 100 पेक्षा जास्त भारतीय नागरिक चीनमध्ये अडकलेले आहेत. पुन्हा विशेष विमान पाठवून नागरिकांना आणण्यासाठी भारत परवानगीच्या प्रतिक्षेत आहे.
चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ आयोग (एनएचसी)ने सांगितलं की, 31 प्रांतात रविवारी कोरोनाचे 409 रूग्ण समोर आले आहेत. तसेच 150 लोकांचा मृत्यू झाला आहे. एनएचसीने सांगितलं की, चीनमध्ये एकूण 77,150 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 150 पैकी 149 लोकांचा मृत्यू हुबेई प्रांतात झाला आहे. तर एका व्यक्तीचा मृत्यू हैनान प्रांतात झाला आहे. एनएचसीने असा दावा केला आहे की, कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांमध्ये कमतरता येत आहे.
जपानमध्ये क्रूजवर 130 हून अधिक भारतीय अडकले, क्रूजमधील 40 प्रवाशांना कोरोना व्हायरसचा संसर्ग
कोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
लक्षणे कोणती आहेत ?
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.
काय काळजी घ्याल?
तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.
संबंधित बातम्या :
कोरोना व्हायरसचा सर्वप्रथम धोका सांगणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू
Corona Virus | जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित