(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमेरिकेला पछाडत चीन ठरला जगातील सर्वात श्रीमंत देश
China Overtakes US: जलद आर्थिक विकासामुळे अमेरिकेला पछाडत चीन जगातील सर्वात श्रीमंत देश ठरला आहे.
China Richest Nation in world: जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला चीनने धक्का दिला आहे. अमेरिकेला पछाडून चीन जगातील सर्वात श्रीमंत देश झाला आहे. मागील दोन दशकात जागतिक संपत्ती तिप्पट वाढ झाल्याने अमेरिकेला मागे सारत चीन जगातील सर्वात श्रीमंत देश झाला आहे. मॅकिन्से अॅण्ड कंपनीच्या ( McKinsey & Co) संशोधन विभागाने ही माहिती दिली. जगातील 60 टक्के संपत्ती असलेल्या 10 देशांच्या राष्ट्रीय ताळेबंदाची तपासणी करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
चीनच्या संपत्ती 113 ट्रिलियन डॉलरने वाढ
McKinsey & Co ने केलेल्या अभ्यासानुसार, जगभरातील निव्वळ संपत्ती 2020 मध्ये 156 ट्रिलियन डॉलरवरून 514 ट्रिलियन डॉलर झाली आहे. या यादीत चीन जगभरात पहिल्या क्रमांकावर आहे. चीनमधील प्रचंड आर्थिक वाढ आणि त्याच्या अर्थव्यवस्थेच्या ताकदीमुळे, 2020 मध्ये चीनची संपत्ती 120 ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे. वर्ष 2000 मध्ये ही संपत्ती फक्त 7 ट्रिलियन डॉलर इतकीच होती. म्हणजेच मागील 20 वर्षात चीनच्या संपत्तीत 113 ट्रिलियन डॉलरची वाढ झाली आहे. त्यामुळेच चीनने अमेरिकेला मागे सारत जगातील सर्वात श्रीमंत देश म्हणून स्थान पटकावले आहे. या कालावधीत अमेरिकेची एकूण संपत्ती दुपटीहून अधिक वाढून 90 ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे. अमेरिकेच्या संपत्तीचा वाढीचा दर चीनच्या तुलनेत खूपच कमी होता.
10 टक्के श्रीमंतांकडे सर्वाधिक संपत्ती
'ब्लूमबर्ग'ने दिलेल्या वृत्तानुसार, मॅकिन्से अँड कंपनीच्या अहवालानुसार, अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये दोन तृतीयांशपेक्षा अधिक संपत्ती 10 टक्के कुटुंबांकडे एकवटली आहे. या 10 टक्के लोकांकडे संपत्तीचे होणारे केंद्रीकरण दिवसेंदिवस वाढत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
LIC IPO ची तयारी जोरात सुरू; 'या' महिन्यापर्यंत शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होणार!
Multibagger stocks: आयटी क्षेत्रातील 'या' स्टॉकने दीड वर्षात एक लाखाचे केले 15 लाख रुपये
Multibagger Stock 2021: या शेअरने गुंतवणुकदारांना केले मालामाल! सहा महिन्यांत 108.93 टक्के परतावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha