(Source: ECI/ABP News/ABP Majha)
China BBC Ban : चीनने बीबीसी वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर घातली बंदी
चीनच्या राष्ट्रीय रेडिओ आणि टेलीव्हिजन प्रशासनाने म्हटले आहे की, बीबीसीने प्रसारणाच्या अटी-नियमांचे उल्लंघन केले आहे.
लंडन : चीनने बीबीसी वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. शिनजियांग प्रांत आणि कोरोनासंदर्भात खोट्या बातम्या प्रसारित केल्याचा ठपका ठेवत ही बंदी लादण्यात आलीय. खोट्या बातम्या देण्याच्या कोणतही प्रकरण सहन केलं जाणार नाही असं चीननं म्हटलंय. शिनजियांग प्रांतासंदर्भातील बीबीसीच्या वृत्तांकनावर चीनने आक्षेप घेतलाय. यासंदर्भातील वृत्त ग्लोबल टाईम्सने दिले आहे.
शिनजियांग प्रांतामधील उइगर मुस्लीम आणि इतर अल्पसंख्यांकावर छावण्यांमध्ये छळ केला जात असल्याचा आरोप गेल्या अनेक वर्षांपासून होतोय. चीनच्या या निर्णयावर ब्रिटन आणि अमेरिकेने निषेध केलाय.
China will not allow the broadcast of BBC World News in Chinese mainland after the broadcaster did a slew of falsified reporting on issues including #Xinjiang and China’s handling of #COVID19, a move experts said send clear signal that fake news is not tolerated in China. pic.twitter.com/92UmMkIFJ9
— Global Times (@globaltimesnews) February 11, 2021
चीनच्या राष्ट्रीय रेडिओ आणि टेलीव्हिजन प्रशासनाने म्हटले आहे की, बीबीसीने प्रसारणाच्या अटी-नियमांचे उल्लंघन केले आहे. अटींमध्ये बातमी सत्य आणि नि:पक्षपातीपणे मांडण्याचे सांगितले आहे. त्यामुळे चीनने बीबीसीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
बीबीसीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. चीन सरकारच्या या निर्णयामुळे आम्ही निराश झालो आहे. बीबीसीचे रिपोर्टर जगभरात निष्पक्षपणे आणि भीतीविना काम करतात.
India China Border | चीनसमोर नरेंद्र मोदी झुकले, त्यांनी चीनला भूप्रदेश का दिला? राहुल गांधींचा सवाल