Chinese Apps Ban: तब्बल 54 चीनी अॅप्स बॅन, भारत सरकारचा चीनला मोठा झटका, जाणून घ्या
याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीयांची गोपनीयता आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचे कारण देत हे निर्बंध लावण्यात आले आहेत.
Chinese Apps Ban: भारत सरकारने (indian government) चीनला पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. सरकारने तब्बल 54 चीनी अॅप्सवर (chini apps) बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. जाणून घ्या कोणते आहेत ते अॅप्स..
भारतीयांची गोपनीयता आणि सुरक्षितता धोक्यात
इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीयांची गोपनीयता आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचे कारण देत हे निर्बंध लावण्यात आले आहेत. बंदी घातलेल्या 54 अॅप्सच्या यादीतील Tencent, Alibaba आणि NetEase शी संबंधित आहेत. 2020 मध्ये बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सपैकी बहुतेक अॅप्स ""रीब्रांडेड तसेच रीक्रिस्टेड" होते. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने या चीनी अॅप्सवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. मंत्रालयाने सांगितले की, हे अॅप्स भारतीयांचा संवेदनशील डेटा चीनसारख्या परदेशातील सर्व्हरवर ट्रान्सफर करत होते. आयटी मंत्रालयाने गुगल प्ले स्टोअरवरून (google play store) हे अॅप्लिकेशन ब्लॉक करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. अधिका-याने सांगितले की, "54 अॅप्स आधीच भारतात प्लेस्टोअरद्वारे ऍक्सेस करण्यापासून ब्लॉक करण्यात आले आहेत." माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69A अंतर्गत हा आदेश देण्यात आला आहे.
सर्व डेटा चीनी सर्व्हरवर पाठवला जात होता
जून 2020 पासून भारत सरकारने 224 हून अधिक चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. यापूर्वी, भारताने 59 अॅप्सवर बंदी घातली, ज्यात TikTok, Shareit, WeChat, Helo, Likee, UC News, Bigo Live, UC Browser, ES File Explorer आणि Mi Community या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "Tencent आणि Alibaba च्या अनेक अॅप्स हे हाँगकाँग किंवा सिंगापूर सारख्या देशांमधून होस्ट केले जात आहेत, परंतु याचा सर्व डेटा चीनी सर्व्हरवर पाठवला जात होता. हे अॅप्स एपीके फाइल्स सारख्या माध्यमातून डाउनलोड केले जात होते आणि सरकारने त्याची दखल घेतली आहे."
महत्वाच्या बातम्या
- China : गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांशी झालेल्या झटापटीत चीनचे 38 सैनिक ठार, मृतांची आकडेवारी लपवणाऱ्या चीनचा बुरखा फाटला
- Budget 2022 : सीमेवर चीन-पाकिस्तानसोबत तणाव; संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या तरतुदी
- अपहरण केलेल्या तरुणाला चीन भारताकडे सोपवणार, प्रोटोकॉलचे पालन करणार
- US Canada Border : चार भारतीयांचा गोठून मृत्यू, बेकायदेशीरपणे अमेरिका-कॅनडा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न