ब्रिटनचे किंग चार्ल्स III यांना कर्करोगाचं निदान; बकिंगहॅम पॅलेसकडून निवेदन जारी करत माहिती
Britain King Charles Diagnosed Prostate Cancer: राजा चार्ल्स तिसरा कर्करोगानं ग्रस्त आहे. प्रोस्टेट ग्रंथीची (Prostate Cancer) तपासणी केली असता, त्यांना कर्करोग झाल्याचं निष्पन्न झालं, असं बकिंघम पॅलेसनं जारी केलेल्या निवेदनातून सांगण्यात आलं आहे.
Britain King Charles Diagnosed With Cancer: ब्रिटनचा राजा चार्ल्स तिसरा (Britain King Charles) यांना कर्करोगाचं निदान झालं आहे. बकिंघम पॅलेसनं (Buckingham Palace) एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. बकिंगहॅम पॅलेसनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, राजा चार्ल्स तिसरा कर्करोगानं ग्रस्त आहे. प्रोस्टेट ग्रंथीची (Prostate Cancer) तपासणी केली असता, त्यांना कर्करोग झाल्याचं निष्पन्न झालं. मात्र, कर्करोगाचा प्रकार समोर आलेला नाही. हा कर्करोग कोणत्या प्रकारचा आणि शरीराच्या कोणत्या भागांत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
बकिंगहॅम पॅलेसनं निवेदनात म्हटलं आहे की, किंग चार्ल्स यांना नियमित उपचारादरम्यान कर्करोग झाल्याचं निदान झालं. यामुळे डॉक्टरांनी राजा चार्ल्स यांना कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कामापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, या काळात ते सरकारी काम करत राहणार आहेत.
किंग चार्ल्स कर्करोगानं ग्रस्त असल्याच्या वृत्तानंतर, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, ते लवकरच पूर्ण ताकदीनिशी परततील यात मला शंका नाही, असं त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटलं आहे. मला माहीत आहे की, संपूर्ण देश त्यांच्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहे.
Wishing His Majesty a full and speedy recovery.
— Rishi Sunak (@RishiSunak) February 5, 2024
I have no doubt he’ll be back to full strength in no time and I know the whole country will be wishing him well. https://t.co/W4qe806gmv
वयाच्या 73 व्या वर्षी राजगादीवर विराजमान
राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर, राजा चार्ल्स तिसरा ब्रिटनचा राजा झाला. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांचा राज्याभिषेक झाला होता. यानंतर त्यांना राजा चार्ल्स तिसरा असं संबोधलं जातं. वयाच्या 73 व्या वर्षी तो राजा झाला. चार्ल्स यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी बकिंगहॅम पॅलेस येथे झाला. जेव्हा त्याच्या आईनं राणी एलिझाबेथ II चा राज्याभिषेक केला, तेव्हा ते 4 वर्षांचे होते. 1969 मध्ये, वयाच्या 20 व्या वर्षी, त्यांची राणीनं कॅर्फर्नॉन कॅसल येथे प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून नियुक्ती केली. चार्ल्स यांनी 29 जुलै 1981 रोजी लेडी डायना स्पेन्सरशी लग्न केलं. त्या लग्नातून त्याला प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी ही दोन मुलं झाली. 28 ऑगस्ट 1996 रोजी हे लग्न तुटलं. 9 एप्रिल 2005 रोजी त्यानं कॅमिला यांच्याशी लग्नगाठ बांधली.
प्रोस्टेट कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ
किंग चार्ल्स तिसरा यांना कर्करोगाचं निदान झालं आहे. किंग चार्ल्स यांना प्रोटेस्ट कॅन्सचं निदान झाल्याची माहिती बकिंगहॅम पॅलेसनं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. जसा दिवसागणिक महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसत आहे. त्याचप्रमाणे, पुरूषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाणंही वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.
पुरूषांमध्ये दिवसेंदिवस प्रोस्टेट कॅन्सरचं वाढतं प्रमाण
जगभरात दिवसागणिक कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. भारतातही या आजाराची प्रकरणं झपाट्यानं वाढत आहेत. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. प्रोस्टेट कॅन्सर फक्त पुरुषांनाच होतो. हा कॅन्सर प्रोस्टेट ग्रंथीमध्येच होतो. या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं वेळेवर ओळखली जात नाहीत. हेच कारण आहे की, त्याची बहुतेक प्रकरणं प्रगत अवस्थेत दिसून येतात. इतर कॅन्सरच्या तुलनेत प्रोस्टेट कॅन्सर शरीरात हळूहळू वाढतो. पूर्वी हा कॅन्सर वयाच्या 60 वर्षांनंतर होत असे, मात्र आता हा कर्करोग 50 वर्षांहून कमी वयाच्या व्यक्तींना होत आहे. या कॅन्सरची लक्षणं सहज ओळखता येतात. एखाद्या व्यक्तीला लघवी करताना त्रास होत असेल, वारंवार लघवी करण्याची इच्छा होत असेल, विशेषतः रात्रीच्या वेळी, लघवी करताना वेदना किंवा जळजळ जाणवत असेल, तर ही प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं असू शकतात. ही लक्षणं दिसल्यास वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. वेळेवर तपासणी करून त्यावर सहज उपचार होऊ शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
लग्नापूर्वी पार्टनरसोबत हॉटेलमध्ये एकत्र रूम बुक करणं शक्य? 'हे' नियम तुम्हाला माहीत असायला हवेच
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )