(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लग्नापूर्वी पार्टनरसोबत हॉटेलमध्ये एकत्र रूम बुक करणं शक्य? 'हे' नियम तुम्हाला माहीत असायला हवेच
Valentine Week: जर तुम्ही अविवाहित असाल आणि तुम्हाला तरीही तुमच्या पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी हॉटेलमध्ये रूम बुक करायची असेल, तर असं करणं कायदेशीर आहे?
Valentine Day : 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine Day 2024) जवळ आला असून प्रेमाचा हा दिवस साजरा करण्यासाठी प्रेमीयुगुलांची लगबग सुरू झाली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Week) आधी व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. एकमेकांना भेटणं, गप्पागोष्टी करणं, डेट करणं यासोबतच कपल्सना एकमेकांसोबत एकांतात वेळ घालवायचा असतो, पण अनेकदा शक्य होत नाही. यासाठी एखाद्या शांत आणि एकांत अशा ठिकाणाच्या शोधात कपल्स असतात. अशावेळी काही कपल्स हॉटेलमध्ये रूम (Hotel Room) बुक करतात. पण अशावेळी त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही हॉटेल्स तर अविवाहित असल्यामुळे त्यांना रूम देणं नाकारतात. पण अविवाहित असतानाही हॉटेलमध्ये रूम बुक करू शकतात का? असं करणं बेकायदेशीर तर नाही? असे अनेक प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात असतात, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...
जर तुम्ही अविवाहित असाल आणि तुम्हाला तरीही तुमच्या पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी हॉटेलमध्ये रूम बुक करायची असेल, तर तुम्ही रूम बुक करू शकता. असं करणं अजिबात बेकायदेशीर नाही. काही नियमांचं पालन करून तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये रूम बुक करू शकता.
कोणतंही हॉटेल अविवाहित जोडप्याला रूम देण्यास नकार देऊ शकत नाही. पण यासाठी एक अट आहे. ती अट म्हणजे, दोघांकडेही वैध ओळखपत्र असणं आवश्यक आहे. अनेक हॉटेल्स पॅनकार्ड स्विकारत नाहीत. अशा परिस्थितीत तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. तुम्ही हॉटेलची खोली ऑनलाईन देखील बुक करू शकता, पण यासाठी वयाची अट आहे. यासाठी, तुमचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणं आणि तुमच्याकडे वैध आयडी किंवा वयाचा पुरावा असणं अनिर्वाय आहे. हॉटेलमध्ये रूम बुक करताना, तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की, अविवाहित जोडप्यांना रूम देणाऱ्या हॉटेल्समध्येच तुम्ही बुकिंग केलं पाहिजे. अनेक हॉटेल्स अविवाहित जोडप्यांना प्रवेश देतच नाही.
तुमच्याच शहरात हॉटेल बुक करू शकता
तुम्ही तुमच्याच शहरात तुमच्यासाठी आणि पार्टनरसाठी रूम बुक करू शकता. अनेक हॉटेल्स लोकल आयडीवरही कपल्ससाठी लोकल आयडीवर राहण्याची परवानगी देतात. त्यामुळे हॉटेल बुक करताना याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण काही हॉटेल्स लोकल आयडीवर राहण्याची परवानगी देत नाहीत.
पोलीस अटक करू शकत नाही
तुमचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि अविवाहित असाल तर पोलीस तुम्हाला अजिबात अटक करू शकत नाहीत. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरजच नाही. तुम्हाला तुमचं ओळखपत्र सोबत ठेवावं लागेल. तसेच, जर कोणी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे नंबर मागितले, तर तुम्हाला ते देण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही त्यांना नकार देऊ शकता. यासाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागणार नाहीत.