Trending : शिक्षकांच्या टोमण्यानं विद्यार्थ्याचं बददलं आयुष्य; वयाच्या 18 व्या वर्षी झाला कोट्यधीश
Trending : हा मुलगा वयाच्या 18 व्या वर्षी कोट्यधीश झाला आहे.
Trending : एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कोणत्या ही गोष्टीमुळे बदलेलू शकतं. अनेकांना शाळेतील शिक्षकांनी टोपणे मारले असतील. परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे तसेच वर्गात मज्जा मस्ती केल्यानं अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना टोपणे मारतात. पण या टोमण्यांकडे विद्यार्थी लक्ष देत नाहित. एका मुलाचं मात्र शिक्षिकेनं मारलेल्या टोमण्यानं आयुष्यचं बदलून गेलं. हा मुलगा वयाच्या 18 व्या वर्षी कोट्यधीश झाला आहे.
एका रिपोर्टनुसार, एरिक फिनमॅन नावाच्या मुलानं असा दावा केला आहे की तो जगातील सर्वात कमी वयाचा बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यानं झालेला कोट्यधीश आहे. त्यानं सांगितलं की, त्याच्या मोठ्या भावानं त्याला क्रिप्टोकरेंसीबाबत माहिती दिली. त्यावेळी एरिकनं गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. तेव्हा त्याचं वय 12 होतं. आता तो 18 वर्षांचा आहे.
युनायटेड किंगडममध्ये, 18 वर्षाखालील मुले कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकत नाहीत. अशा वेळी, मुलांचे पालक काही ट्रेडिंग यंत्रणा वापरून त्यांच्या मुलांच्या वतीने स्टॉकमध्ये गुंतवणूक करू शकतात. एरिक फिनमॅननं त्याच्या शाळेबद्दल सांगितलं की, त्याच्या शाळेत उपस्थित असलेल्या लोकांना त्याला काय करायचे आहे हे कधीच समजू शकलं नाही.
शाळेतील शिक्षकांनी मारला होता टोमणा
एरिक फिनमॅननं सांगितलं की, शाळेतील शिक्षकांनी त्याला एकदा टोपणा मारला होता. ते म्हणाले होते की तु शिक्षण सोडून दे आणि मॅकडॉनल्डमध्ये जाऊन काम कर. तु आयुष्यात काहीच करू शकत नाही. त्यानंतर एरिकनं आई-वडिलांना वचन दिलं होतं की तो 18 वर्षाचा झाल्यावर कोट्यधीश होईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine Conflict and India : रशिया-युक्रेन युद्ध झाल्यास भारतावर काय होईल परिणाम?
- Explainer : रशियानं युक्रेनमधील प्रांताबाबत घेतलेल्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
- ED Investigating This 5 High Profile Cases : ED हाताळत असलेली आजवरची 'ही' हाय प्रोफाईल प्रकरणं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha