Jayant Patil : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 : 23 तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा कळेल की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमानाने जपणारा महाराष्ट्र आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
Jayant Patil : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष इस्लामपूर मतदारसंघाचे उमेदवार जयंत पाटील यांनी साखराळे या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मुलगा प्रतीक आणि राजवर्धनसह मतदानाचा हक्क बजावला. जयंत पाटील यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन जनतेला केले. जयंत पाटील म्हणाले की, भाजपचा राष्ट्रीय नेता पैशांसोबत सापडतो यावरून सिद्ध होते की भाजप या निवडणुकीत काय करत आहे. हे महाराष्ट्राला खरेदी करायला निघाले आहेत, महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, महाराष्ट्र विकणार नाही. 23 तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा कळेल की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमानाने जपणारा महाराष्ट्र आहे.
आजची निवडणूक महाराष्ट्रातील शेतकरी, युवक, महिलांसाठी व महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 20, 2024
आपला महाराष्ट्र धर्म हा संपूर्ण भारताला एक दिशा देतो आणि त्याच धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे.
म्हणूनच आपण सर्वांनी या अत्यंत निर्णायक व महत्वाच्या… pic.twitter.com/ZB3Wbwsqls
माझे लोक मला मोठ्या मताधिक्याने निवडून देतील
जयंत पाटील यांनी सांगितले की, या मतदारसंघाने मला नेहमीच भरघोस मतांनी निवडून दिले आहे. यावेळीही लोक मला मोठ्या मताधिक्याने निवडून देतील तसेच महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणावर निवडून येतील. मोठ्या बहुमताने महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जयंत पाटील म्हणाले की, काल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विरार येथे पैशांसह पकडण्यात आले आणि देशभरात एकच खळबळ माजली. ही खळबळ थांबवण्यासाठी सुप्रियाताईंच्या ऑडिओ क्लिपचे कुंबाड रचले गेले. लोकांना भाजपला ओळखले आहे हा पक्ष खोटा बोलणाराही आहे आणि पक्ष फोडणाराही आहे. भाजपचे लोक असे वागतात हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. खोटे नाटक उभा करणे हे भारतीय जनता पार्टीचे वैशिष्ट्य आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये भाजप काय करते हे विरारमधील प्रकरणामुळे जनतेला समजले, असे म्हणत विरारमधील प्रकरणावरून जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली.
मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स आहे! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी#SuhasKande #SameerBhujbal #MaharashtraAssemblyElection2024 #NandgaonAssemblyConstituency #MaharashtraElection2024https://t.co/vMVOjLRi22
— ABP माझा (@abpmajhatv) November 20, 2024
इतर महत्वाच्या बातम्या