एक्स्प्लोर

मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी

Sameer Bhujbal vs Suhas Kande : नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघात (Nandgaon Assembly Constituency) अपक्ष उमेदवार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या गटात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. सुहास कांदे यांनी बोलविलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवले. समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना घेऊन चाललेली बस अडवली. यानंतर सुहास कांदे तिथे आले असता त्यांनी थेट समीर भुजबळांना मारून टाकण्याची धमकी दिली. आज तुझा मर्डर फिक्स आहे, असे सुहास कांदे समीर भुजबळांना संतापून म्हणाले. यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे. 

सुहास कांदेंची समीर भुजबळांना धमकी

सुहास कांदेंनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळांनी अडवली. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यानंतर मोठा राडा झाला. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला. कुठल्याही परिस्थितीत मतदार जावू देणार नाही, असा पवित्रा भुजबळांनी घेतला होता. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे हे दोघेही आमनेसामने आल्याचे दिसून आले. आज तुझा मर्डर फिक्स आहे, असे म्हणत सुहास कांदेंनी समीर भुजबळांना थेट मारून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.  

मतदारांनी व्यक्त केला संताप

काही वेळाने समीर भुजबळांनी अडवून ठेवलेले मतदार संतापल्याचे पाहायला मिळाले. "आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला मतदानापासून वंचित ठेवू नका, पोलिसांनो...आमचे आधारकार्ड तपासा, आम्ही बिहारी नाही तर मतदार संघातलेच आहोत, जेवणासाठी केवळ थांबलेलो होतो, संयम बाळगला, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका", असे म्हणत मतदारांनी संताप व्यक्त केला.

काय म्हणाले छगन भुजबळ?

छगन भुजबळ म्हणाले की, दोन्ही उमेदवार समोर आले हा मुद्दा नाही. कांदे यांच्या संबंधित व्यक्तीची शाळा आहे. तिथे हजार लोक आणून ठेवले होते. सचिन मानकर हिस्ट्री शुटर तिथे पिस्तूल घेऊन आला. तुला मारून टाकेल, असे समीरला बोलला, असा आरोप त्यांनी केलाय. तेच पोलिसांनी त्याला गाडीत बसवले आणि नंतर सोडून दिले. पोलीस असे वागत असतील तर कसे चालेल? मी एसपींना सांगितले आहे की, तुम्ही असे कराल तर तिथे खून पडतील. याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची असेल, अशा रीतीने दादागिरी चालू असेल तर आम्हीही तयार आहोत, असा इशारा देखील छगन भुजबळ यांनी दिला. इथे मर्डर होतील, पोलीस यंत्रणा ताब्यात घेतली आहे. या दादागिरी विरोधात समीर भाऊ निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेंनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget