एक्स्प्लोर

ED Investigating These 5 High Profile Cases : ED हाताळत असलेली आजवरची 'ही' 5 हाय प्रोफाईल प्रकरणं

ED Investigating This 5 High Profile Cases : सध्या राज्यात चर्चा रंगलीये ती ईडीच्या कारवायांची. जाणून घेऊया ईडीची आतापर्यंतची हाय प्रोफाईल प्रकरणं.

ED Investigating This 5 High Profile Cases : महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेमुळे देशभरात वातावरण चांगलच तापलं आहे. एकीकडे नवाब मलिक (Nawab Malik) यांना 3 मार्चपर्यंत EDची कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे मलिक यांच्या अटकेमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाक्युद्ध युध्द पाहायला मिळतंय. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजता ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं, 7 वाजता त्यांना घेऊन ते पथक मुंबईच्या ईडी कार्यालयाकडे रवाना झालं आणि त्यानंतर तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारमधील दुसऱ्या मंत्र्याला ईडीकडून अटक करण्यात आली आणि राज्यात पुन्हा राजकारण पेटलं. ही संपूर्ण घडामोड अंडरवर्ल्डशी संबंधित मनी लॉंड्रिंग प्रकरणी असून नवाब मलिक यांचा संबंध थेट अंडरवर्ल्ड आणि Dawood Ibrahim ची बहिण Haseena Parkar सोबत असल्याचा युक्तिवाद ईडीनं केला.

एकंदरीत हे प्रकरण कुठवर जाणार? हे सांगणं थोडं कठीण आहे. पण आरोप-प्रत्यारोपांपासून सुरु होऊन अटकेपर्यंत आलेलं हे प्रकरण मात्र नक्कीच हाय प्रोफाईल आहे. 2002 साली PMLA कायदा लागू झाल्यानंतर ED नं अनेक कारवाया केल्या आणि त्यातील अनेक प्रकरणं ही हाय प्रोफाईल होती. 

जाणून घेऊया ED नं आजवर हाताळलेली किंवा हाताळत असलेल्या 5 हाय प्रोफाईल प्रकरणांबद्दल सविस्तर... 

1.  ऑगस्टा वेस्टलँड VVIP हेलिकॉप्टर घोटाळा (AugustaWestland VVIP Helicopter Scam)

2007 – 2008    दरम्यान कॉंग्रेस सरकारच्या काळात देशातील अतिम्हात्त्वाच्या म्हणजेच, VVIP व्यक्तींसाठी काही Helicopters घेण्याचा निर्णय झाला. यासाठी इटलीतील Finmeccanica कंपनीची उपकंपनी असलेल्या AugustaWestland या कंपनीसोबत 12 Helicopters चा करार करण्यात आला होता. परंतु कालांतराने या संपूर्ण व्यवहारात 3600  कोटी रुपयांचा घोटाळा  झाल्याचं समोर आलं. करारादरम्यान मध्यस्थी असणाऱ्या Chiristian Michel आणि Rajiv Saxena यांना अटक करण्यात आली. सध्या ED या प्रकरणाची चौकशी करत आहे.

2. INX मीडिया केस (INX Media Case)

उद्योजक इंद्राणी मुखर्जी आणि पती पीटर मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या INX मीडियाने विदेशी गुंतवणुकीच्या कायद्याचं उल्लंघन करत परदेशातून 350 कोटींची गुंतवणूक आपल्या कंपनीत आणली होती. 2007 सालची ही घटना असून 2009 साली दाम्पत्यानं कंपनीतून आपला काढता पाय घेतला. P Chidambaram अर्थमंत्री असताना त्यांनी या गुंतवणुकीस परवानगी देताना गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या संदर्भातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं 2018 मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

3. स्टर्लिंग बायोटेक घोटाळा (Sterling Bitoech Scam)

2019 साली उघड झालेला हा घोटाळा PNB Bank घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याचं EDनं म्हटलं होतं. वडोदरास्थित स्टर्लिंग बायोटेक लिमिटेड आणि संदेसरा ग्रुपने भारतीय बँकांची 14,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दीप्ती संदेसरा हे या बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असून भारतीय बँकांच्या परदेशी शाखांकडून त्यांनी खाजगी कामांसाठी 9 हजार कोटींचं कर्ज घेतल्याचं समोर आलं. कथित बँक घोटाळा करण्यासाठी कंपनीनं  249 हून अधिक देशांतर्गत आणि 96 परदेशी कंपन्यांचा वापर केला होता. सध्या ईडीनं स्टर्लिंग बायोटेक प्रवर्तकांची 9,778 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. 

4. रोझ व्हॅली चिट फंड घोटाळा (Rose Valley Chit Fund Scam)

Chit Fund घोटाळे भारतानं आजवर अनेक पाहिलेत, पण 2013 सालचा हा घोटाळा अनेकांची झोप उडवणारा होता. ईडीच्या अंदाजानुसार, देशभरातील हजारो गुंतवणूकदारांकडून 17,520 कोटी रुपये उभारण्यात आले होते. हा संपूर्ण घोटाळा अंमलात आणण्यासाठी तब्बल 27 कंपन्यांचा वापर केला असून त्यातील अधिक कंपन्या या बोगस होत्या. Rose Valley Group चे अध्यक्ष Gautam Kundu यांना 2015 अटक करण्यात आली होती. सध्या ईडीकडून या प्रकरणाचा तपास अजूनही सुरु आहे.   

5. कोळसा खाण वाटप घोटाळा (Coalgate)

Coal Block Allocation Scam म्हणजे, देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक. उत्खननासाठी दिल्या जाणाऱ्या कोळशाच्या खाणींसंदर्भातील हा घोटाळा. अनेक खाजगी आणि सरकारी कंपन्यांचा यात समावेश आहे. 2004-2009 या कालावधीत अकार्यक्षम पद्धतीनं 194 कोळसा खाणींचं वाटप झाल्याचं CAG च्या अहवालात उघडकीस आलं. ज्यामुळे देशाला 1.86 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. ED सध्या या प्रकरणाची चौकशी करत असून Ramsarup Lohh Udyog Ltd आणि EMTA Coal Ltd या कंपन्यांची काही मालमत्ता नुकत्याच जप्त केल्या आहेत. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

About the author संकेत वरक

संकेत वरक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी

व्हिडीओ

Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report
Barack Obama Pasaydan Special Reportमाऊलींच्या पसायदानाची ओबामांना भुरळ,सोशल मीडियावर प्लेलिस्ट शेअर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Embed widget