एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Stolen Bentley Found in Pakistan : लंडनमध्ये चोरलेली कार घेऊन चोरटा पाकिस्तानात भुर्रर्र... पोलिसांनी कशी शोधली कार?

Stolen Car Found in Pakistan : काही आठवड्यांपूर्वी लंडनमध्ये चोरी झालेली कार पाकिस्तानात सापडली आहे.

Stolen Luxury Car From Uk Found in Pakistan : चोर चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती शोधतात. मात्र कितीही हातसफाई किंवा चलाखी केली तरी अखेर त्यांचं पितळ उघडं पडतं. तुम्ही आजपर्यंत अनेक चोरीच्या घटना ऐकल्या असतील. कधी घराच्या भिंती, कधी छतात, तर इतरही अनेक ठिकाणी चोर चोरी केलेल्या वस्तू लपवत असतात. कधी-कधी एका शहरात चोरी केलेली गाडी दुसऱ्या शहरात किंवा राज्यात विकली जाते. मात्र यावेळी चोरांनी चोरीची कार चक्क सातासमुद्रापार पोहोचवली आहे. चोरांनी ब्रिटनमध्ये महागडी गाडी चोरली, मात्र ही गाडी अखेर सापडली पण ती पाकिस्तानात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं घडलं. तर त्यासाठी ही सविस्तर बातमी वाचा.

कराचीमध्ये सापडली चोरलेली बेंटले मुल्सेन कार

ब्रिटनची राजधानी लंडनमधून एक अतिशय आलिशान बेंटली कार पाकिस्तानात सापडली. लंडनमध्ये चोरीला गेलेली बेंटली कार पाकिस्तानच्या कराची शहरात सापडली आहे. लंडनमधून बेंटले मुल्सेन कार चोरून कराचीत आणण्यात आली होती. कराचीच्या सीमाशुल्क अधिकार्‍यांनी या माहितीवर शिक्कामोर्तब करत, लंडनमधील कार सापडल्याचं सांगितलं आहे. ब्रिटनच्या गुप्तचरांनी पाकिस्तानी अधिकार्‍यांना माहिती दिली होती की, एक महागडी चोरीची कार कराचीच्या डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटी (DHA) परिसरातील एका घरात पार्क केलेली आहे. सीमाशुल्क विभागाने या माहितीच्या आधारे कारवाई करत कार मालकाला ताब्यात घेतलं असून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.

लंडनमध्ये काही आठवड्यांपूर्वी चोरी झाली होती कार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लंडनमध्ये काही आठवड्यांपूर्वी दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीची आलिशान बेंटले मुल्सेन सेडान कार चोरीला गेली होती. ही चोरलेली महागडी कार पाकिस्तानमधील कराची येथील एका बंगल्यात सापडली आहे. लंडनची राजधानी लंडनमधून ही कार चोरून कराचीत आणण्यात आली होती. लंडनमधून कार चोरून कराचीत कशी आणली जाऊ शकते, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. 

पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, कराची येथील कलेक्टर ऑफ कस्टम्स एन्फोर्समेंट (CCE) ने ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीकडून माहिती मिळाल्यानंतर छापा टाकताना कराची शहरातील एका बंगल्यातून चोरीची बेंटले मुल्सेन सेडान कार जप्त केली आहे. रिपोर्टनुसार, ही कार कराची शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या डीएचए भागातील एका बंगल्यातून जप्त करण्यात आली आहे.

कशी शोधली कार?

एका पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, कार चोरल्यानंतर चोराने कार कराचीला आणली. परंतु लाखो प्रयत्नांनंतरही चोर बेंटले कारमधून ट्रेसिंग ट्रॅकर काढू शकला नाही. त्याच आधारे लंडन पोलिसांनी कारचा पत्ता शोधून काढला आणि कारची माहिती पाकिस्तान प्रशासनाला दिली. ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यांनी कारच्या जप्तीसाठी पाकिस्तान पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यानंतर कार जप्त करण्यात आली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray MNS Symbol :राज ठाकरेंच्या मनसेची मान्यता रद्द होणार?Anant Kalse On Vidhan Sabha | मनसेची मान्यता रद्द होणार? अनंत कळसे म्हणाले...Deepak Kesarkar on Eknath Shinde | एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळावं- दीपक केसरकरRashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
Embed widget