Viral Video : व्हिडीओ कॉलवर अंतिम संस्काराचा कार्यक्रम सुरू, चुकून कॅमेरा सुरू राहिला अन् महिलेच्या अंघोळीचं लाईव्ह स्ट्रिमिंग
London Viral Video : जे लोक अंतिम संस्कार कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकणार नाहीत त्यांच्यासाठी झूम व्हिडीओ कॉलची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचवेळी एका महिलेकडून मोठी चूक झाली.
![Viral Video : व्हिडीओ कॉलवर अंतिम संस्काराचा कार्यक्रम सुरू, चुकून कॅमेरा सुरू राहिला अन् महिलेच्या अंघोळीचं लाईव्ह स्ट्रिमिंग Barnet north London funeral video call woman bath showers during Zoom livestream viral video Viral Video : व्हिडीओ कॉलवर अंतिम संस्काराचा कार्यक्रम सुरू, चुकून कॅमेरा सुरू राहिला अन् महिलेच्या अंघोळीचं लाईव्ह स्ट्रिमिंग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/25/50609f8403e05fd93fc45dccb2a8207b171137574197393_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
London Viral Video : व्हिडीओ कॉलच्या वापरामुळे आपल्या अनेक अडचणी सुटल्याचं दिसून येतंय. एखाद्या ठिकाणी न जाता आपण त्या ठिकाणी हजर राहू शकतो, एकाच वेळी अनेकांशी बोलू शकतो. पण जर त्यामध्ये थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी त्याचा मोठा फटका बसू शकतो. असाच फटका एका महिलेला बसला आणि तिला आता जन्माची अद्दल घडली. एका अंतिम संस्काराच्या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून उपस्थिती लावताना तिचा कॅमेरा तसाच सुरू राहिला आणि ती अंघोळ करतानाचा व्हिडीओचे लाईव्ह स्ट्रिमिंग झालं. उत्तर लंडनमध्ये ही घटना घडली.
ज्या लोकांना अंतिम संस्काराला उपस्थिती लावता येणार नव्हतं, त्यांच्यासाठी झूम व्हिडीओ कॉलची सोय करण्यात आली होती. त्यावेळी एका महिलेनेही त्यामध्ये सहभाग नोंदवला. चुकून तिने मोबाईलचा कॅमेरा सुरूच ठेवला आणि ती अंघोळीला गेली. त्यामुळे जे जे लोक त्या व्हिडीओ कॉलवर होते, त्यांनी त्या महिलेला विना कपडे पाहिलं.
बिझनेस वूमनच्या लक्षात आलं नाही
उत्तर लंडनमधील एका व्यक्तीचा कँसरमुळे मृत्यू झाला. त्याच्या अंतिम संस्काराचा कार्यक्रम सुरू होता. एका बिझनेस वूमेनला तिच्या मोबाईलचा कॅमेरा सुरू असल्याचं लक्षात आलं नाही. त्यानंतर ती अंघोळीला गेली. कॅमेराचा अँगल त्याच दिशेने होता ज्या दिशेला ती अंघोळ करत होती.
moment woman bares all at funeral as she showers during Zoom livestream(Barnet, north London-UK) 2203024 / Huiveringwekkend moment waarop vrouw alles blootlegt tijdens begrafenis terwijl ze doucht tijdens Zoom livestream (Barnet, Noord-Londen, VK) pic.twitter.com/4Zijx5RjMm
— john l (@Maeestro) March 22, 2024
चर्चमध्ये असलेल्या लोकांचं लक्ष हे त्या व्यक्तीच्या अंतिम संस्काराच्या कार्यक्रमाकडे होतं, त्यामुळे त्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला नाही. पण नंतर मात्र त्या महिलेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. अनेकांनी तो व्हॉट्सअॅपवर शेअर केला.
झूम कॉल दरम्यानही लोक थेट स्क्रीनवर येऊ शकतात, त्यावेळी अनेकांना त्यांचा कॅमेरा सुरू असल्याचं समजत नाही. एका महिलेने लॉग इन केले आणि तिला कळले नाही की तिचा कॅमेरा चालू आहे आणि ती आंघोळ करत आहे.
या आधी अशी अनेक प्रकरणं
ही महिला पहिली व्यक्ती नाही जिच्यासोबत हे घडले आहे. 2021 च्या सुरुवातीला कॅनडाचे खासदार विल्यम अमोस देखील त्यांच्या सहकाऱ्यांसमोर पूर्णपणे नग्न अवस्थेत अशाच प्रकारे दिसले होते. त्यांच्या डेस्कच्या मागे उभा असलेला त्यांचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. त्यांच्या एका हातात मोबाईल होता. तसेच इस्टेट एजंट डॅमियन म्लोटकोव्स्की त्यांच्या सहकाऱ्यांसोबत साप्ताहिक व्हर्च्युअल कॉलवर होते, त्यावेळी त्यांचे पती जेम्स बॉवर्स आंघोळ केल्यावर नग्नावस्थेत कॅमेरात दिसले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)