एक्स्प्लोर

Bangladesh PM Sheikh Hasina Servant Jahangir Alam : स्वत:चं हेलिकाॅप्टर अन् बरंच काही! बांगलादेश पंतप्रधानांच्या नोकराची संपत्ती पाहून अख्ख्या बाॅलिवूडला चक्कर येईल

बांगलादेशमध्ये माजी लष्करप्रमुख, पोलीस अधिकारी, कर अधिकारी आणि अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणे समोर आली आहेत. पंतप्रधानांच्या नोकराचेही नाव या यादीत आहे.

Bangladesh PM Sheikh Hasi Servant Jahangir Alam : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या नोकराची संपत्ती पाहून बांगलादेशसह जगाचे डोळे विस्फारले आहेत. त्याच्याकडे खासगी हेलिकॉप्टर आहे आणि ते कुठेही प्रवास करण्यासाठी तेच वापरतो. ढाका ट्रिब्यूननुसार या नोकराचे नाव जहांगीर आलम आहे. तो पंतप्रधान हसिना यांच्या घरी पाहुण्यांना पाणी देत होता. जहांगीरने हसीनाच्या कार्यालयात आणि घरात केलेल्या कामाचा दाखला देत अनेक लोकांकडून लाच घेतली होती. काम करून देण्याच्या बहाण्याने तो लोकांकडून पैसे उकळायचा. हे प्रकरण समोर आल्यानंतर पंतप्रधान हसिना यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, जहांगीर आधीच अमेरिकेत पळून गेला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्याची 284 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

बांगलादेशमध्ये माजी लष्करप्रमुख, पोलीस अधिकारी, कर अधिकारी आणि अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणे समोर आली आहेत. पंतप्रधानांच्या नोकराचेही नाव या यादीत आहे. जहा

'एवढं कमवायला एका सामान्य बांगलादेशीला 13 हजार वर्षे लागतील'

पीएम हसीना म्हणाल्या, "माझ्या घरी काम करणारी व्यक्ती आज करोडोंच्या मालमत्तेची मालक आहे. त्याने एवढा पैसा कुठून कमवला? एका सामान्य बांगलादेशी व्यक्तीला एवढी संपत्ती जमवायला 13 हजार वर्षे लागू शकतात. सरकारने काळजी घ्यायला हवी. या बाबींची गांभीर्याने चौकशी करत आहे. खरं तर, जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, 17 कोटी लोकसंख्या असलेल्या बांगलादेशात दरडोई उत्पन्न 2.11 लाख रुपये आहे. शेख हसीनाचा नोकर भ्रष्टाचारात गुंतल्याचे समोर आल्यापासून विरोधक सरकारला कोंडीत पकडत आहेत. बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे प्रवक्ते वहिदुझ्झमन म्हणाले की, हसीनाच्या नोकराकडे एवढा पैसा असताना मालकाकडे किती पैसे आहेत याचा अंदाज लावता येणार नाही. त्यानंतरही या सेवकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याला नुकतेच नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

हसीना यांचे निकटवर्तीय भ्रष्टाचार प्रकरणात घेरले आहेत

जानेवारीमध्ये पंतप्रधान हसिना चौथ्यांदा सत्तेवर आल्यापासून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. बांगलादेशच्या लाचलुचपत प्रतिबंधक आयोगाने नुकतीच देशाच्या माजी राष्ट्रीय पोलीस प्रमुख बेनझीर अहमद यांच्याविरोधात चौकशी सुरू केली आहे. एकेकाळी हसीनाच्या जवळच्या असलेल्या बेनझीर यांच्यावर करोडोंची संपत्ती असल्याचा आरोप आहे, जी त्यांनी भ्रष्टाचारातून जमा केली आहे. अमेरिकेने 2021 मध्ये अहमदवर अनेक निर्बंधही लादले होते. अहमद यांच्यावर शेकडो लोकांच्या अचानक बेपत्ता होण्याच्या किंवा त्यांच्या हत्येच्या प्रकरणांमध्ये सामील असल्याचा आरोप होता.

त्याचबरोबर बांगलादेशच्या स्थानिक वृत्तपत्रांनी देशाचे माजी लष्करप्रमुख अझीझ अहमद यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. हे अहवाल समोर आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक आयोगाने अझीझ यांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या होत्या. याशिवाय त्यांची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
PM Modi In AKola : महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
Radhakrishna Vikhe Patil : आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
Jayant Patil on Ajit Pawar : पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM :  9 नोव्हेंबर 2024: ABP MajhaPrashant Bamb Sabha : बंब यांच्या सभेत गोंधळ , प्रश्न विचारणाऱ्याला धक्काबुक्कीAvinash Jadhav on Sanjay Raut : बाळासाहेबांनी काँग्रेसबाबत काय सांगितलं ते राऊत विसरले ?Saroj Ahire NCP Nashik : शिवसेनेच्या उमेदवाराला थांबवलं जाईल अशी प्राथमिक माहिती -सरोज अहिरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
PM Modi In AKola : महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
Radhakrishna Vikhe Patil : आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
Jayant Patil on Ajit Pawar : पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
D. K. Shivakumar : महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; पीएम मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Embed widget