Donald Trump : जीवघेण्या हल्लात वाचल्यानंतर अवघ्या 48 तासात डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार घोषित; उपराष्ट्राध्यक्षपदासाठी 40 वर्षीय खासदाराला संधी
Donald Trump : 13 जुलै रोजी पेनसिल्व्हेनियामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर ट्रम्प पहिल्यांदाच सार्वजनिक व्यासपीठावर दिसले. त्याच्या कानावर पट्टी बांधली होती.
Donald Trump : अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आहे. विस्कॉन्सिनच्या मिलवॉकी शहरात झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात ट्रम्प यांना प्रतिनिधींकडून 2387 मते मिळाली. त्यांना उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी 1215 मतांची गरज होती.13 जुलै रोजी पेनसिल्व्हेनियामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर ट्रम्प पहिल्यांदाच सार्वजनिक व्यासपीठावर दिसले. त्याच्या कानावर पट्टी बांधली होती. गोळीबाराच्या 48 तासांनंतर पक्षाने त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित केले.
ट्रम्प परिषदेत पोहोचताच समर्थकांनी 'यूएसए-यूएसए'च्या घोषणा दिल्या. लोक हवेत मुठी हलवत 'लढा-लढा' म्हणतानाही दिसत होते. शनिवारी गोळी झाडल्यानंतर ट्रम्प यांनी हवेत मुठ उंचावत फाईट-फाइट म्हटले. या अधिवेशनाला ट्रम्प यांची मुले एरिक आणि डोनाल्ड ज्युनियरही उपस्थित होते. परिषद संपल्यानंतर ट्रम्प निघू लागले तेव्हा लोकांनी 'आम्ही ट्रम्प यांच्यावर प्रेम करतो' अशा घोषणाही दिल्या. यावेळी काही समर्थकांचे डोळेही ओलावले. मात्र, खुद्द ट्रम्प यांनी अधिवेशनात एकदाही गोळीचा उल्लेख केला नाही.
अनिवासी भारतीयांना डावलून जेम्स डेव्हिड व्हॅन्स यांना उमेदवारी
ट्रम्प यांनी अनिवासी भारतीयांना डावलून जेम्स डेव्हिड व्हॅन्स यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार केले. रिपब्लिकन पक्षाकडून उपाध्यक्षपदासाठी 39 वर्षीय जेम्स डेव्हिड व्हॅन्स यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अधिवेशनात कोणत्याही प्रतिनिधींनी व्हॅन्स यांना विरोध केला नाही. 2022 मध्ये वन्स प्रथमच ओहायोमधून सिनेटर म्हणून निवडून आले. ते ट्रम्प यांच्या जवळचे मानले जातात.
तथापि, 2021 पर्यंत ट्रम्प समर्थक होण्यापूर्वी, व्हॅन्स हे त्यांचे कट्टर विरोधक होते. 2016 मध्ये एका मुलाखतीत व्हॅन्स यांनी ट्रम्प यांना निषेधास पात्र म्हटले होते. त्यांच्या स्वभावावर आणि नेतृत्वशैलीवरही प्रश्न उपस्थित केले गेले. त्यानंतर 2021 मध्ये त्यांनी याबाबत ट्रम्प यांची माफी मागितली. रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर ते ट्रम्प यांच्या जवळ आले.
विवेक रामास्वामी आणि निक्की हेली यांचीही चर्चा
रिपब्लिकन पक्षाकडून उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी दोन भारतीयांची नावेही पुढे आली होती. यामध्ये विवेक रामास्वामी आणि निक्की हेली यांचा समावेश होता. रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार होण्याच्या शर्यतीत हे दोन्ही नेते ट्रम्प यांच्या विरोधात उभे ठाकले होते. नंतर निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी आपले नाव मागे घेतले. यानंतर अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, उपाध्यक्षपदासाठी विवेक रामास्वामी ट्रम्प यांची पहिली पसंती असेल. तथापि, माजी राष्ट्रपतींनी भारतीय वंशाच्या उमेदवारांना नाकारले आणि उपराष्ट्रपतीपदासाठी व्हॅन्स यांची निवड केली. विशेष म्हणजे व्हॅन्स यांच्या पत्नी उषा चिलुकुरी व्हॅन्स याही भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत. डेव्हिड व्हॅन्स हा नाटो विरोधक आणि इस्रायलचे कट्टर समर्थक आहेत
इतर महत्वाच्या बातम्या