एक्स्प्लोर

Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

Bharat Gogawale On Gatari Amavasya 2026 : 13 ऑगस्टपासून श्रावण सुरू होत असून पुढचे 1 महिना 15 दिवस पोटाला अन् शरीराला आराम द्या, असा सल्ला शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

रायगड : सण-उत्सवांच्या काळात राजकीय नेते कार्यकर्त्यांना शुभेच्छा देताना तुम्ही पाहिले असेल, परंतु महायुती सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेली एक खास 'सल्लावजा विनंती' सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. 12 तारखेला गटारी अमावस्या आहे, जास्त कोणी गटार-बिटारात लोळू नका, असा थेट अन् गावरान सल्ला भरत गोगावले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांच्या या भाषणाची व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Bharat Gogawale Viral Statement : काय म्हणाले मंत्री भरत गोगावले?

कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपल्या खास शैलीत बोलताना भरत गोगावले म्हणाले की, "12 तारखेला गटारी अमावस्या आहे. त्यामुळे जास्त कोणी गटार-बिटारात लोळू नका. 13 तारखेला श्रावण सुरू होतोय. पुढे 1 महिना आणि 15 दिवस गणपती जाईपर्यंत आपल्याला कडक नियम पाळायचे आहेत. आतापर्यंत ज्याने जे काही केले असेल, त्याने आता थोडे पाळा आणि आपल्या पोटाला व शरीराला आराम द्या."

Shravan 2026 Context : 13 ऑगस्टपासून श्रावणारंभ

महाराष्ट्रात आषाढ अमावस्येला म्हणजेच गटारी अमावस्येला (Gatari Amavasya) मांसाहार आणि मद्यपानाची हौस भागवून दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच श्रावण महिन्यापासून (Shravan Month) सलग महिनाभर मांसाहार वर्ज्य करण्याची परंपरा आहे. यंदा 13 ऑगस्ट पासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होत असून, त्यानंतर लागलीच गणेशोत्सवाचे वेध लागणार आहेत.

या पार्श्वभूमीवर पुढील दीड महिना तरी संयम बाळगा आणि आरोग्याची काळजी घ्या, अशा मिश्कील शब्दांत गोगावलेंनी कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया उमटत आहेत.

Raigad Guardian Minister Dispuet : पालकमंत्रिपदासंबंधी दावा

दरम्यान, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आपलं नाव निश्चित झाल्याचा दावा मंत्री भरत गोगावले यांनी केला. मंगळवारी संध्याकाळी आपलं नाव जाहीर करण्यात येईल असंही ते म्हणाले होते. मात्र अद्याप तरी रायगडच्या पालकमंत्रिपदासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

यंदाच्या 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाचा मान पालकमंत्री म्हणून आपल्यालाच मिळेल, असा दावा मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा आहे. 

ही बातमी वाचा : 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
Embed widget