AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
AI Virus: आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI आता केवळ माहिती आणि तंत्रज्ञानापुरत मर्यादित राहिलेल नाही, तर त्याने थेट जीवशास्त्राच्या क्षेत्रातही प्रवेश केला आहे.

AI Virus: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) अर्थात एआय (AI) आता केवळ माहिती तंत्रज्ञान आणि कोडिंगपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्याने थेट जीवशास्त्राच्या (Biology) क्षेत्रात प्रवेश केला आहे. अमेरिकेतील जगप्रसिद्ध स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी (Stanford University) आणि आर्क इन्स्टिट्यूटच्या (Arc Institute) संशोधकांनी एआयच्या मदतीने निसर्गात अस्तित्वात नसलेले पूर्णपणे नवीन व्हायरस (Virus) तयार केले आहेत. या ऐतिहासिक संशोधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात उपचारांच्या नव्या आशा निर्माण झाल्या असल्या, तरी भविष्यातील सुरक्षेबाबत जगाची चिंता वाढली आहे.
संशोधकांनी स्पष्ट केले आहे की, एआयने डिझाइन केलेले हे व्हायरस मानवी शरीराला संक्रमित करणारे नाहीत. हे प्रामुख्याने 'बॅक्टेरियोफेज' आहेत. म्हणजेच केवळ बॅक्टेरियांना (Bacteria) संक्रमित करून नष्ट करणारे विषाणू. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये या एआय-डिझाइन केलेल्या जीनोम असलेल्या व्हायरसने औषध-प्रतिरोधक असलेल्या E. coli सारख्या प्राणघातक बॅक्टेरियांनाही यशस्वीरीत्या नष्ट केले. त्यामुळे भविष्यात औषधांना दाद न देणाऱ्या 'सुपरबग' आणि संसर्गांवर प्रभावी उपचार करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होऊ शकतो.
AI Virus: वैद्यकीय क्षेत्रासाठी आशेचा किरण
सध्या जगभरात अँटिबायोटिक रेझिस्टन्सची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक सामान्य औषधे आता बॅक्टेरियांवर परिणाम करत नाहीत. अशा वेळी एआयच्या माध्यमातून विशिष्ट बॅक्टेरियांना शोधून मारणारे कृत्रिम व्हायरस तयार करणे हे वैद्यकीय शास्त्रातील एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे.
AI Virus: बायोसेफ्टी आणि सुरक्षेबाबत जगभरात चिंता
एकीकडे या यशामुळे आनंद व्यक्त होत असताना, दुसरीकडे जैवसुरक्षा तज्ज्ञांनी यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. एआयच्या साहाय्याने संपूर्ण व्हायरल जीनोम डिझाइन करण्याची क्षमता आता प्रत्यक्षात आली आहे. भविष्यात या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरणारे जैविक घटक किंवा जैविक शस्त्रे तयार केली जाऊ शकतात का? असा प्रश्न बायोसेफ्टी तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. एआयची ही अभूतपूर्व झेप एकाच वेळी मानवी वैद्यकीय उपचारांसाठी मोठा आशेचा किरण ठरू शकते, तर दुसरीकडे संपूर्ण जगाच्या जैवसुरक्षेसाठी एक मोठा इशारा ठरू शकते.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Before You Go
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी






















