(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Asteroid News: पुन्हा एका लघुग्रहाचा पृथ्वीच्या दिशेने प्रवास; नासाने दिला इशारा
Asteroid News : लघुग्रह 2023 HZ4हा पृथ्वीच्या दिशेने वेगाने प्रवास करत आहे. याचा इशारा नासा संस्थेने दिला आहे.
Asteroid News : अंतराळात अनेक लघुग्रह (Asteroid) फिरतात, कधी-कधी हे पृथ्वीच्या (Earth) जवळून जातात. असाच एक असा लघुग्रह वेगाने पृथ्वीच्या दिशेने प्रवास करत असल्याची माहिती अमेरिकाच्या नासा (NASA) या संस्थेने दिली आहे. तसेच हा लघुग्रह लवकरच पृथ्वीच्या जवळ येईल अशी भिती देखील नासाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
नासाने दिलेल्या वृत्तानुसार, पृथ्वीजवळून 2023 HZ4 हा लघुग्रह 1.19 मिलिअन किमी इतक्या जवळ येईल. हा लघुग्रह ताशी 81 हजार 907 किलोमीटर वेगाने पुढे जात आहे. सध्याच्या प्रक्षेपणानुसार, हा मोठा खडक ग्रहाजवळून जाईल आणि कोणतीही हानी होणार नाही. या लघुग्रहाचा शोध नुकताच लागला असल्याचं देखील नासानं सांगितलं आहे. परंतु विशेष म्हणजे, पृथ्वीच्या जवळ येणारा हा एकमेव लघुग्रह नाही. होय, आणखी दोन लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येणार असल्याचं नासानं सांगितलं आहे. तसेच, यापैकी एकही लघुग्रह पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असंही नासाने म्हटले आहे.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, दररोज पृथ्वीवर 100 टन पेक्षा जास्त धूळ आणि वाळूच्या कणांचा भडिमार होतो. वर्षातून सुमारे एकदा, एक ऑटोमोबाईल आकाराचा लघुग्रह पृथ्वीच्या वातावरणावर आदळतो, एक प्रभावी फायरबॉल तयार करतो आणि पृष्ठभागावर पोहोचण्यापूर्वी जळून जातो. जर 25 मीटरपेक्षा मोठा पण एक किलोमीटरपेक्षा लहान (1/2 मैलापेक्षा थोडा जास्त) खडकाळ उल्का पृथ्वीवर आदळला, तर त्याच्या प्रभावाने स्थानिक क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 'आमचा विश्वास आहे की एक ते दोन किलोमीटरपेक्षा मोठी कोणत्याही लघुग्रहाचा किंवा कोणत्याही अंतराळातील गोष्टीचा ( एक किलोमीटर म्हणजे दीड मैलापेक्षा थोडे जास्त) जगभरात परिणाम होऊ शकतो', असे नासा या अमेरिकेच्या संस्थेने म्हटले आहे.
What is Asteroid : ॲस्टरॉयड म्हणजे काय?
ॲस्टरॉयड (Asteroid) म्हणजेच लघुग्रह. लघुग्रह किंवा उल्का या बद्दल तुम्ही ऐकलं असेल. लघुग्रह किंवा उल्का हे असे खगोलीय पिंड आहे जे अवकाशात आपल्या सौरमालेत फिरत राहते. सूर्यमालेतील इतर ग्रहांप्रमाणेच सूर्याभोवती फिरतात.
5.4 किलोमीटर व्यासाचा, सर्वात मोठा ज्ञात संभाव्य धोकादायक लघुग्रह टॉटाटिस आहे. तुलनेने, जे लघुग्रह मंगळ आणि गुरू यांच्यातील मुख्य लघुग्रह पट्ट्यात भरतात आणि पृथ्वीला कोणताही धोका नसतो. ते 940 किलोमीटर (सुमारे 583 मैल) इतके मोठे असू शकतात.