(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Joe Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची सायकल स्वारी, सायकलिंग करताना तोल गेला अन्...
Joe Biden Fell on Road : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सध्या कुटुंबियांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. यावेळी बायडन सायकलिंग करताना अचानक रस्त्यावर पडले.
Joe Biden Bicycle Ride : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (America President Joe Biden) सायकल स्वारी (Cycling) करताना सायकलवरून पडले. जो बायडन डेलावेअरमधील त्यांच्या बीच हाऊसच्या परिसरातील (Beach House) हेनलोपेन स्टेट पार्क जवळ शनिवारी सायकलिंग करताना तोल गेला अन् ते खाली पडले (Fall Down). बायडन सायकलवरून उतरण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्या तोल जाऊन ते रस्त्यावर कोसळले. यावेळी त्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्वरीत त्यांना मदत करत उठवलं. बायडन यांनी नंतर सुरक्षारक्षकांना सांगितलं की ते ठीक आहेत, त्याचा पाय सायकलमध्ये अडकला होता.
अमेरिकेचा 79 वर्षीय राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांची पत्नी जिल बायडन सकाळी सालकलिंग करण्यास निघाले. रस्त्यात लोकांना भेटतं बायडन सायकल चालवत होते. त्यानंतर बायडन लोकांना भेटण्यासाठी सायकल थांबवून सायकलवरुन उतरण्याचा प्रयत्न करताना तोल जाऊन खाली पडले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने ते लगेच उठले.
कुटुंबियांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत बायडन
जो बायडन सध्या कुटुंबियांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. ते अमेरिकेतील डेलावेअर येथे कुटुंबियांसोबत त्यांच्या वेळ घालवत आहेत. जो बायडन त्यांची पत्नी जील बायडन यांच्यासोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी येथे पोहोचले आहेत.
अटलांटामध्ये तीन वेळा अडखळले बायडन
गेल्या महिन्यात बायडेन त्यांच्या अधिकृत एअर फोर्स वन विमानाच्या पायऱ्या चढत असताना पडताना थोडक्यात बचावले. गेल्या वर्षीही अटलांटा येथे अशीच एक घटना घडली होती. जेव्हा बायडेन विमानाच्या पायऱ्यांवर तीन वेळा अडखळले होते. बायडेन यांनी त्यावेळी सांगितलं की, जोरदार वाऱ्याच्या वेगामुळे ते अडखळले.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- India - Bangladesh Relationship : बांगलादेशची 'मँगो डिप्लोमसी', पंतप्रधान हसीनांकडून राष्ट्रपती, पंतप्रधानांसाठी एक मेट्रिक टन 'आम्रपाली' आंब्याची भेट
- अमेरिकेत Apple स्टोरची युनियन, कर्मचाऱ्यांच्या बहुमतानं प्रस्ताव मंजूर
- Stefania Maracineanu : कोण आहेत स्टेफानिया मोरेचिनानु? ज्यांना गुगलने डुडलद्वारे दिली श्रद्धांजली