America : अमेरिकेत सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार, इंडियानामध्ये तिघांचा मृत्यू, 24 तासांत गोळीबाराच्या 3 घटना
America Shooting : अमेरिकेत इंडियाना येथे एका पार्टीमध्ये झालेल्या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. फिलाडेल्फियामधील गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले आहेत.तर शिकागोमध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय.
Gun Violence in America : अमेरिकेमध्ये सातत्यानं गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. पुन्हा एकदा अमेरिकेच्या इंडियाना येथील गोळीबाराची घटना समोर आली आहे. इंडियानामधील गॅरी सिटीमध्ये (Indiana Gary City) एका पार्टीमध्ये गोळीबार झाला. या दुर्घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये तीन ठिकाणी गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत.
इंडियानामध्ये झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला आहे. पेनसिल्व्हेनियामधील (Pennsylvania) फिलाडेल्फिया (Philadelphia) शहरातही गोळीबाराची घटना घडली आहे. तर शिकागोमध्ये झालेल्या गोळीबारात 6 लोकांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत 24 तासांत तीन ठिकाणी गोळीबाराच्या घटना
मागील 24 तासांत अमरिकेत तीन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अमेरिकेच्या इंडियानामधील एका पार्टीमध्ये गोळीबार झाला. त्याआधी फिलाडेल्फिया (Philadelphia) येथे स्वातंत्र्य दिनाच्या परेडवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामुळे चेंगराचेंगरीही झाली. गोळीबारात दोन पोलीसही जखमी झाला आहेत.
शिकागो गोळीबारात सहा लोकांचा मृत्यू
अमेरिकेत शिकागोमध्ये 4 जुलै रोजी स्वातंत्र्य दिनाच्या परेडवर झालेल्या गोळीबारात 6 लोकांचा मृत्यू झाला असून 59 लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी या परिसरात नाकेबंदी केली आहे. या घटनेवर राष्ट्रपती जो बायडन यांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान हायलँड पार्कमध्ये गोळीबाराचा आरोपी असलेल्या 22 वर्षीय रॉबर्ट क्रिमोला पोलिसांनी शर्थीच्या प्रयत्नानंतर अटक केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या