(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LGBT Law in US : अमेरिकेत LGBT समुदायासाठी मोठी बातमी, समलैंगिक विवाह कायद्याला मंजुरी
US House Approves Gay Marriage Law : अमेरिकेमध्ये राहणाऱ्या LGBT समुदायासाठी चांगली बातमी आहे. अमेरिकमध्ये समलैंगिक विवाह कायद्याला मंजुरी देण्यात आली आहे.
US House Approves Gay Marriage Law : अमेरिकेमध्ये राहणाऱ्या LGBT समुदायासाठी (LGBT Community) चांगली बातमी आहे. अमेरिकमध्ये (America) समलैंगिक विवाह कायद्याला (Gay Marriage Law) मंजुरी देण्यात आली आहे. यूएस हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्हमध्ये (United States House of Representatives) गुरुवारी समलैंगिक विवाह कायदा आणि आंतरजातीय विवाह कायद्याला मंजुरी देण्यात आली आहे. सीएनएन (CNN) वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (US President) जो बायडन (Joe Biden) यांच्याकडे समलैंगिक विवाह कायदा विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. या विधेयकाच्या बाजून संसदेत 258 पैकी 169 मतं मिळाली. यामध्ये 39 रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांनीही सहमती दर्शवली आहे. सिनेटमध्ये म्हणजेच अमेरिकन संसदेमध्ये गेल्या आठवड्यात हे विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या समर्थनार्थ 61 मते पडली, तर 36 जणांनी या विधेयकाला विरोध केला. त्यानंतर या विधेयकाला कनिष्ठ सहभागृहातही (US Congress Lower Chamber) मंजुरी मिळाल्याने आता अमेरिकेत समलैंगिक विवाहाला मान्यता मिळाली आहे.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची प्रतिक्रिया
कनिष्ठ सभागृह समलैंगिक विवाह कायदा विधेयक मंजूर झाल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आनंद व्यक्त केला आहे. बायडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'अमेरिकन लोकांना त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्याचा अधिकार आहे हे सुनिश्चित करण्यासाठी आज सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.' बायडेन पुढे म्हणाले की, यूएस हाऊस हा महत्त्वपूर्ण कायदा मंजूर झाल्याने लाखो LGBTQI+ आणि आंतरजातीय जोडप्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आता LGBT समुदाय आणि त्यांच्या मुलांना मिळणाऱ्या हक्कांची आणि संरक्षणाची हमी सरकारकडून देण्यात आली आहे.
बायडन यांनी सांगितलं की, माझी पत्नी जिल आणि मी आजच्या दिवशी त्या धैर्यवान समलैंगिक जोडप्यांना आणि त्यासोबत उभ्या राहणाऱ्या वकिलांच्या संघर्षाची आठवण करुन देत आहोत. त्यांचे प्रयत्न आज सार्थक झाले आहेत. त्यांनी अनेक दशकं देशव्यापी वैवाहिक समानतेसाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. आम्ही LGBTQI+ अमेरिकन आणि सर्व अमेरिकन लोकांना समान अधिकार मिळण्यासाठीचा संघर्ष कायम ठेवू, असंही बायडेन म्हणाले.
या कायद्यामुळे कट्टरतावाद्यांविरुद्ध लढण्यास मदत होईल : नॅन्सी पेलोसी
नॅन्सी पेलोसी म्हणाल्या, 'समलैंगिक विवाहाविरोधातील कट्टरपंथीयांविरोधात आपल्याला उभं राहावं लागेल. हे विधेयक मंजूर झाल्याने समलैंगिक विवाहाविरोधातील कट्टरतावादी गटांना आळा घालण्यास मदत होईल. पेलोसी यांनी सांगितलं की, या कायद्याअंतर्गत फेडरल कायद्यांतर्गत विवाह समानता टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात मदत होईल.