America Firing : अंदाधुंद गोळीबार करत होता हल्लेखोर, लोकांचा आक्रोश, व्हिडीओ व्हायरल
America Firing : ही धक्कादायक घटना घडवून आणणाऱ्या हल्लेखोरांचे वय केवळ 18 ते 20 वर्षांच्या दरम्यान असल्याचा दावा केला जात आहे.
America Firing : अमेरिकेतील शिकागो येथील हायलँड पार्क येथे स्वातंत्र्यदिनाच्या परेडदरम्यान झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला असून 57 जण जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना घडवून आणणाऱ्या हल्लेखोरांचे वय केवळ 18 ते 20 वर्षांच्या दरम्यान असल्याचा दावा केला जात आहे. अमेरिकेत गेल्या काही वर्षांत गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या गोळीबाराचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडीयावर व्हायरल होऊ लागले आहेत.
अचानक झालेल्या गोळीबारीने गोंधळ उडाला
अमेरिकेच्या शिकागो शहरात सोमवारी सकाळी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याचा जल्लोष सुरू असताना अचानक झालेल्या गोळीबारीने गोंधळ उडाला. गोळीबार झाल्याने लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या भीषण गोळीबाराचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. या घटनेनंतर शिकागो शूटिंगशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या घटनेशी संबंधित व्हिडिओ प्रेक्षकांचे लक्ष विचलित करू शकतात.
हल्लेखोर इमारतीच्या छतावर उभा राहून करत होता गोळीबार
असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक हल्लेखोर इमारतीच्या छतावर उभा राहून लोकांवर गोळीबार करताना दिसत आहे. अचानक झालेल्या गोळीबारामुळे घाबरलेले लोक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावताना दिसत आहेत.
Exact moments as shots are heard as a mass shooting unfolds in Highland Park during a 4th of July parade celebration. #highlandpark #masshooting pic.twitter.com/kAPpr52OBg
— CHICAGO CRITTER (@ChicagoCritter) July 4, 2022
सुट्टीमुळे रस्त्यावर गर्दी
या घटनेशी संबंधित आणखी एका व्हिडिओमध्ये गोळीबारानंतर लोक गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहेत. 4 जुलै रोजी सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा केला. व्हायरल व्हिडिओमध्ये एका व्यक्तीसोबत एक लहान मुलही दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सोमवारी झालेल्या गोळीबारात बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला, तर 57 जण जखमी झाले. या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला तर 57 जण जखमी झाले. मात्र, ही घटना घडवून आणण्यामागील हल्लेखोरांचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही.
गोळीबार प्रकरणात पहिली अटक
या गोळीबार प्रकरणात पोलिसांना यश आले आहे. तासाभराच्या मेहनतीनंतर पोलिसांनी गोळीबारातील आरोपी रॉबर्ट ई क्रेमो याला अटक केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, उत्तर शिकागो अधिकाऱ्याच्या स्पॉटिंगनंतर अटक आरोपी पकडला गेला आहे. मे महिन्यात अमेरिकेत गोळीबाराच्या दोन घटनांनी अमेरिकेसह संपूर्ण जग हादरले होते. त्यापैकी टेक्सास येथील एका शाळेत गोळीबाराची एक घटना घडली होती, ज्यामध्ये 21 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच वेळी, मे महिन्यातच, दुसरी घटना न्यूयॉर्कमधील एका दुकानात घडली, ज्यामध्ये 10 लोकांना आपला जीव गमवावा लागला.