Chinese Woman in Pakistan : भारतीय अंजूनंतर आता चिनी तरुणी सीमापार पोहोचली, प्रियकराला भेटण्यासाठी थेट पाकिस्तान गाठलं
Chinese Woman in Pakistan : भारताच्या अंजूनंतर आता चिनी तरुणी प्रियकरासाठी पाकिस्तानातच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोहोचली आहे.
Chinese Woman in Pakistan : सध्या सीमेपलीकडील प्रेमकहाण्या खूप चर्चेत आहेत. पाकिस्तानातून 4 मुलांसह भारतात पोहोचलेली सीमा हैदर आणि भारतातील भिवंडीतून पाकिस्तानात पोहोचलेल्या अंजूचीही सध्या चर्चा सुरु आहे. आता, एका चिनी तरुणीची पाकिस्तानी तरुणासोबतची प्रेमकहाणीही समोर आली आहे. सीमा आणि अंजू यांच्याप्रमाणेच चीनच्या एका तरुणीने प्रेमासाठी थेट पाकिस्तान गाठलं आहे.
अंजू आणि सीमा हैदरसारखी आणखी एक कहाणी
आता एका चिनी तरुणीची पाकिस्तानी तरुणासोबतची प्रेमकहाणीही चर्चेत आली आहे. सीमा आणि अंजू यांच्याप्रमाणेच चीनच्या शांक्सी प्रांतातील 20 वर्षांची गाओ फांग ही तरुणी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानला पोहोचली आहे. भारतीय महिला अंजूने तिचा पाकिस्तानमधील फेसबुक बॉयफ्रेंड नसरुल्लासोबत लग्न केल्यानंतर आता एक चिनी महिला पाकिस्तानात पोहोचली आहे. या चिनी महिलेलाही तिच्या पाकिस्तानी प्रियकरासोबत लग्न करायचं आहे.
आता चिनी महिलेने ओलांडली सीमा
या चिनी महिलेचं नाव गाओ फेंग असल्याचं सांगण्यात येत आहे. ही चिनी महिला प्रेमासाठी थेट पाकिस्तानात पोहोचली आहे. चीनच्या शांक्सी प्रांतातील गाओ फांग नावाची 20 वर्षीय तरुणीही आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या खालच्या दिर जिल्ह्यात पोहोचली आहे. येथे तिचा 18 वर्षांचा प्रियकर जावेद राहतो. जावेद गाओ फँगपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे.
चिनी तरुणीला पाकिस्तानी प्रियकरासोबत लग्न करायचंय
पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, गाओ फांग तीन महिन्यांच्या टुरिस्ट व्हिसावर पाकिस्तानात पोहोचली आहे. जावेद हा खैबर पख्तुनख्वामधील बाजौरचा रहिवाशी आहे. सध्या तो लोअर दीरजिल्ह्यातील समर बाग भागात त्याच्या काकासोबत राहतो. इथेच त्याची चिनी मैत्रीण त्याला भेटायला आली होती. दोघेही लवकरच लग्न करू शकतात, असंही सांगितलं जात आहे. पाकिस्तानात पोहोचल्यावर चिनी गाओ फांगने इस्लाम धर्म स्वीकारला असल्याचं म्हटलं जात आहे. इस्लाम धर्मानुसार, तिने आपलं नाव किसवा ठेवलं आहे. लोअर दीरजिल्ह्याचे पोलीस अधिकारी झियाउद्दीन यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही चिनी महिलेला कडक सुरक्षा दिली आहे.
भारतीय अंजू पाकिस्तानात
सीमा हैदर (Seema Haider) प्रकरण चर्चेत असतानाच अंजू मीणा (Anju Meena) प्रकरणाने सर्वांनाच धक्का बसला आहे. आपल्या फेसबुकवरील प्रियकराला भेटण्यासाठी अंजू ही भारतीय महिला पाकिस्तानात (Indian Woman Anju in Pakistan) गेली आहे. अंजू तिचा प्रियकर नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोहोचली आहे. त्यानंतर दोघांनी लग्न केल्याचा दावा केला आहे. अंजूची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा तिचे वडील प्रसाद थॉमस यांनी केला आहे. अंजूच्या अशा वागण्यामुळेच तिच्या वडिलांनी तिला सोडून दिल्याचं त्यांनी सांगितलं.
संबंधित इतर बातम्या :