Anju in Pakistan: 'ती डोक्याने सनकी', अंजूचे वडील म्हणाले- ती पाकिस्तानात गेल्याबद्दल मला माहित नाही, 20 वर्षांपासून माझा...
Anju Pakistan News: प्रियकरासाठी पाकिस्तानला गेलेल्या अंजूच्या वडिलांनी त्यांच्या मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं म्हंटलं. त्यांचा जावई खूप साधा माणूस आहे, असंही ते म्हणाले.
Indian Woman in Pakistan: सीमा हैदर (Seema Haider) प्रकरण सावरतं कुठे तेच देशात अंजू मीणा (Anju Meena) विषयाचा उदय झाला आहे. आपल्या फेसबुकवरील प्रियकराला भेटण्यासाठी अंजू ही भारतीय महिला पाकिस्तानात (Indian Woman Anju in Pakistan) गेली आहे. अंजूची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा तिचे वडील प्रसाद थॉमस यांनी केला आहे. अंजूच्या अशा वागण्यामुळेच तिच्या वडिलांनी तिला सोडून दिल्याचं त्यांनी सांगितलं. अंजू मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि तिचा कोणाशीही प्रेमसंबंध नाही, असं तिच्या वडिलांनी सांगितलं. अंजू तिचा प्रियकर नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोहोचली आहे.
मुलगी पाकिस्तानात गेल्याची माहितीही नव्हती
अंजूचे वडील प्रसाद थॉमस हे ग्वाल्हेर जिल्ह्यातील टेकनपूर शहराजवळील बौने गावात राहतात. अंजू पाकिस्तानात गेल्याची माहितीही नव्हती, असं त्यांनी सांगितलं. माझ्या मुलाने मला सांगितलं, की दीदी पाकिस्तानला गेली आणि तेव्हा मला याबाबत कळाल्याचं अंजूच्या वडिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. अंजू डोक्याने सनकी होती आणि त्यामुळेच तिच्याशी संबंध तोडल्याचं तिचे वडील म्हणाले. अंजू तीन वर्षांची होती तेव्हापासून ती उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यात तिच्या मामाकडे राहते, असंही वडील प्रसाद थॉमस म्हणाले.
20 वर्षांपासून अंजूशी काहीही संबंध नाही
अंजूचे वडीस प्रसाद थॉमस म्हणाले की, 20 वर्षांपूर्वी अंजूचं लग्न झालं, त्यानंतर माझा तिच्याशी कोणताही संबंध नाही. 20 वर्षांपासून अंजूचं तोंड देखील पाहिलं नसल्याचं तिचे वडील म्हणाले. मुलीने उचललेलं पाऊल योग्य नाही, असं त्यांनी म्हटलं. त्याचसोबत मुलगी सनकी असल्याचा दावा त्यांनी केला. अंजूला दोन मुलं आहेत आणि दोघंही त्यांच्या वडिलांसोबत राहतात, त्यामुळे मुलीने उचललेलं हे पाऊल अयोग्य असल्याचं तिचे वडील म्हणाले. तिच्याशी संपर्क नसल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं.
अंजूचे कोणाशीही प्रेमसंबंध असू शकत नाहीत
अंजूचा पती, म्हणजेच जावयाबद्दल बोलताना प्रसाद थॉमस म्हणाले की, तो खूप साधा माणूस आहे, पण अंजूचीच मानसिक स्थिती चांगली नाही. पण अंजूचे कोणाशीही प्रेमसंबंध असू शकत नाहीत, कारण ती अशा गोष्टींमध्ये कधीच गुंतणार नाही, असा दावाही तिच्या वडिलांनी केला. अंजू थोडी स्वतंत्र असली तरी ती कोणत्याही मुलाच्या प्रेमात पडणार नाही, याची हमीही त्यांनी दिली. अंजूच्या वडिलांनी सांगितलं की, तिने बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे आणि एका कंपनीत ती काम करते.
खूप वर्षापूर्वी प्रसाद थॉमस यांनी धर्म परिवर्तन केलं होतं. त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. ज्यानंतर त्यांचं नाव बदलून प्रसाद थॉमस असं करण्यात आलं.
व्हिसाची मुदत संपल्यानंतर भारतात परतेल
अंजूचा पाकिस्तानी मित्र नसरुल्लाह याने सोमवारी सांगितलं की, अंजूचा व्हिसा 20 ऑगस्टला संपल्यानंतर ती भारतात परतणार आहे. त्याने त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या. नसरुल्लाह (29) याने सांगितलं की, अंजूशी लग्न करण्याचा त्याचा कोणताही विचार नाही. अंजूचा जन्म उत्तर प्रदेशातील कैलोर गावात झाला आणि ती राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथे राहते. नसरुल्लाह आणि अंजू यांची फेसबुकवर 2019 मध्ये मैत्री झाली.
हेही वाचा:
India: सीमा हैदर प्रेमप्रकरण गाजत असताना राजस्थानची अंजू पाकिस्तानात; प्रियकरासाठी वाट्टेल ते!