एक्स्प्लोर

Afghanistan : काबुल विमानतळावर गोंधळ; अमेरिकेच्या तीन हजार सैन्यांच्या कुमकीनंतर विमानतळ पुन्हा सुरु

Taliban : तालिबान्यांच्या हिंसाचाराचा अनुभव घेतलेल्या नागरिकांनी काबुल विमानतळावर गर्दी केल्याने एकच गोंधळ माजला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेने तीन हजारांची अतिरिक्त कुमक पाठवली आहे.

काबुल : दोन दशकांच्या युद्धानंतर काही प्रमाणात स्थिरता आलेल्या अफगाणिस्तानचा अमेरिकन सैन्य माघारी गेल्यानंतर केवळ दोन आठवड्यातच पाडाव झाला. तालिबान्यांनी बघता-बघता देश ताब्यात घेतला आणि ते आता अंतरिम सरकार बनवण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत या आधी तालिबान्यांच्या हिंसाचाराचा अनुभव आलेल्या लोकांनी देश सोडून जाण्यासाठी प्रयत्न सुरु केला असून त्यांनी काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काल काबुल विमानतळ बंद करण्यात आलं होतं. आता अतिरिक्त 3000 अमेरिकन सैन्य विमानतळावर पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा ते सुरु करण्यात आलं आहे. 

अमेरिकेने प्रशिक्षित केलेल्या अफगाणिस्तानच्या तीन लाख सैन्यांनी केवळ 60 ते 80 हजारांच्या तालिबान्यांसमोर गुडघे टेकलं असून त्यामुळे देशात अनागोंदीचं वातावरण निर्माण झालं आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती काही भयावह बनत आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. नागरिक देश सोडून जाण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मिळेल त्या मार्गाने नागरिकांना देशातून म्हणजेच तालिबान्यांच्या तावडीतून बाहेर पडायचं आहे. विमानतळावर विमानांच्या अवतीभोवती नागरिकांना गर्दी केलीय. अशातचा विमानाला लटकून प्रवास करण्याच्या प्रयत्नात हवेतून खाली पडून सातहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय.

अफगाणिस्तानमधील सद्यस्थितीचा भयावह व्हिडीओ! जीव वाचवण्यासाठी विमानाला लटकलेल्या दोघांचा पडून मृत्यू

काबुल विमानतळ एकमेव मार्ग आहे जिथून लोक देश सोडून बाहेर जाऊ शकतात. त्यामुळेच मोठ्या संख्येने लोक तिथे जमले आहेत. येथील भयावह स्थितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. विमानात जागा नाही म्हणून लोक रेल्वे, बसला जसं लटकावं तसं विमानाला लटकताना दिसत आहेत. काही लोकांनी विमान टेक ऑफ घ्यायच्या आधी विंगमध्ये बसून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. विमान ज्यावेळी हवेत होतं, त्यावेळी काही जणांना खाली पडून मृत्यू झाल्याचं व्हिडीओतून दिसत आहे. 

अमेरिकेची तीन हजारांची अतिरिक्त कुमक
काबुल विमानतळावरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आपल्या नागरिकांची सुखरुपपणे सुटका करण्यासाठी अमेरिकेने तीन हजार सैन्यांची अतिरिक्त कुमक त्या ठिकाणी पाठवली आहे. अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने तालिबानच्या नेत्यांशी यावर चर्चा केली असून विमानतळावरुन लोकांना बाहेर काढण्याच्या कामामध्ये दखल न देण्याचा आग्रह केल्याची माहिती आहे.

Afghanistan : राष्ट्रपती अशरफ घनी सत्ता सोडणार; तालिबानचा कमांडर मुल्लाह अब्दुल घनी बरादार बनणार राष्ट्राध्यक्ष 

तालिबान बनवणार अंतरिम सरकार
राष्ट्रपती अशरफ घनी यांनी आता अफगाणिस्तानच्या सत्तेवर पाणी सोडलं असून त्याचे हस्तांतरण करण्याची तयारी ठेवली आहे. तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकार स्थापन होत असून तालिबानचा कमांडर मुल्लाह अब्दुल घनी बरादार हा राष्ट्राध्यक्ष असेल अशी माहिती आहे. काबुल स्थित राष्ट्रपती परिसरातून अफगाणिस्तानला इस्लामी अमीरात बनवल्याची घोषणा करण्यात येणार असून तालिबानच्या या अंतरिम सरकारला चीनने समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानही तशा प्रकारचा अधिकृत निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती आहे.

Afghanistan : 25 वर्षापूर्वीचा काळा इतिहास; तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींची निर्घृणपणे हत्या करुन मृतदेह खांबावर लटकवला

पहा व्हिडीओ : Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील परिस्थितीसाठी राष्ट्रपती Ashraf Ghani जबाबदार : Joe Biden

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget