एक्स्प्लोर

Afghanistan Crisis : टोलो न्यूजच्या पत्रकाराला तालिबान्यांकडून मारहाण; देशातील गरिबीचे रिपोर्टिंग करत असल्याचं कारण

Afghanistan Crisis : देशातील गरिबीचे रिपोर्टिंग करत असल्याच्या कारणावरुन टोलो न्यूजच्या (TOLOnews) झियार खान याद (Ziar Yad) या पत्रकाराला आणि त्याच्या कॅमेरामनला तालिबान्यांनी जबर मारहाण केली आहे. 

काबुल : अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर काहीच दिवसात तालिबान्यांनी आपला मूळ रंग दाखवायला सुरुवात केली आहे. देशातील गरीबी आणि बेरोजगारीचे रिपोर्टिंग करणाऱ्या टोलो न्यूजचा पत्रकार झियार खान याद आणि त्याच्या कॅमेरामनला तालिबान्यांनी जबर मारहाण केली आहे. सुरवातीला झियार खान यादच्या हत्येची बातमी पसरली होती. पण हे वृत्त खोटं असल्याचं स्वत: झियार खान यादने स्पष्ट केलं. 

टोलो न्यूजचा पत्रकार झियार खान याद हा काबुलमध्ये रिपोर्टिंग करत होता. त्यावेळी काही तालिबानी दहशतवादी त्याच्या जवळ आले आणि त्यांनी झियार खान यादला जबर मारहाण केली. यावेळी झियार खान यादच्या कॅमेरामनलाही मारहाण करण्यात आली. यावेळी झियार खान याद हा अफगाणिस्तानच्या गरिबी आणि बेरोजगारीचे रिपोर्टिंग करत असल्याची माहिती आहे. 

सुरुवातीला झियार खान यादच्या मृत्यूची अफवा पसरवली होती. नंतर या वृत्ताचं खंडन त्याने स्वत: केलं. झियार यादने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "मला तालिबान्यांनी मारहाण केली, माझ्या कॅमेरामनलाही मारहाण करत सर्व साहित्याची नासधूस केली. माझा मोबाईलही काढून घेतला. काही जणांकडून माझ्या मृत्यूची अफवा पसरवण्यात आली. तालिबान्यांनी केवळ बंदुकीचा धाक दाखवून मला मारहाण केली." 

 

त्यानंतर आणखी एका ट्वीटमध्ये झियार याद म्हणतो की, "मला त्या लोकांनी का मारहाण केली हे माहित नाही. मी तालिबानच्या वरिष्ठांकडे याची तक्रार केली आहे. पण अद्याप आरोपींना पकडण्यात आलं नाही आणि हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हाणीकारक आहे."

या आधी भारतीय पत्रकाराची हत्या
अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करत असलेले रॉयटर्सचे पत्रकार दानिश सिद्दीकी यांची तालिबान्यांकडून 16 जुलैला हत्या करण्यात आली होती. दानिश सिद्दीकी अफगाणिस्थानमधील परिस्थिती कव्हर करण्यासाठी अफगाणिस्थानात गेले होते. दानिश सिद्दीकी मूळचे दिल्लीतील रहिवाशी होते. दानिश सिद्दीकी यांची हत्या कांधार प्रांतातील स्पिन बोल्डक परिसरात करण्यात आली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget