पिझ्झा बनवण्याच्या कणकेच्या गोळ्यावर चक्क टॉयलेट स्वच्छ करण्याचा ब्रश, Dominos किचनचा फोटो होतोय व्हायरल
Dominos Pizza : स्वच्छता आणि स्वच्छतेचा दावा करणाऱ्या डॉमिनोजच्या किचनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Dominos Pizza : पिझ्झाची सामान्य भारतीयांना ओळख करून दिली ती डॉमिनोजने असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पिझ्झा बनवणारा हा जगातला मोठा ब्रँड आहे. ऑर्डर केल्यानंतर अर्ध्या तासात घरपोच पिझ्झा आला नाही तर मोफत पिझ्झा किंवा एकावर एक पिझ्झा फ्री अशा आकर्षक जाहिरातीमुळे कायमच चर्चेत राहिले आहे. पण या जाहिरातीमागे कधी-कधी अशी काही दृश्ये दडलेली असतात, जी पाहिल्यानंतर अशा गोष्टी खाव्याशा वाटणार नाहीत. तुम्हाला खात्री नसेल तर व्हायरल होणारा हा फोटो पाहा. स्वच्छता आणि स्वच्छतेचा दावा करणाऱ्या डॉमिनोजच्या किचनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिझ्झा बेस बनवण्यासाठी कणकेच्या गोळ्यावर चक्क टॉयलेट स्वच्छ करण्याचे ब्रश लटकावून ठेवलेले दिसत आहेत. साहिल कारनानी या ट्विटर युजरने शेअर केलेल्या एका फोटोनंतर या चर्चेला उधाण आले आहे.
युजरने शेअर केलेल्या फोटोमध्ये डॉमिनोजच्या पिझ्झा ब्रेडसाठी मळून ठेवलेल्या कणकेच्या गोळ्यावर चक्क टॉयलेट स्वच्छ करण्याचे ब्रश लटकावून ठेवलेले दिसत आहेत. "अशा पद्धतीने डॉमिनोज आपल्याला फ्रेश पिझ्झा पुरवतो, अत्यंत गलिच्छ", असे कॅप्शन युजरने दिले आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट करून संताप व्यक्त केला.
This is how @dominos_india serves us fresh Pizza! Very disgusted.
— Sahil Karnany (@sahilkarnany) July 24, 2022
Location: Bangalore @fssaiindia @MoHFW_INDIA @mla_sudhakar @mansukhmandviya #foodsafety pic.twitter.com/1geVVy8mP5
संबंधीत फोटो हा डॉमिनोजच्या बंगळुरू येथील दुकानातील असल्याचे सांगितलेले आहे. हा फोटो डॉमिनोजचा आहेत की नाही याची खात्री झाली नव्हती. परंतु नंतर डॉमिनोज यावर स्पष्टीकरण दिले की, आम्ही स्वच्छता आणि स्वच्छतेची चांगली काळजी घेतो पण व्हायरल झालेला फोटो हा केवळ एक आऊटलेटमधीलआहे. आम्ही त्या दुकानावर कडक कारवाई केली आहे.
"हे स्वयंपाकघर नाही, तर स्टोअर रूम आहे. कर्मचाऱ्यांचे कपडे आजूबाजूला लटकले आहेत. पिझ्झा बेसच्या ट्रेवर मॉपसह एक झाडू लटकलेला आहे. जर साठवणुकीसाठी योग्य व्यवस्था नसेल, तर झाडू-पुसण्यासाठी किमान एक कोपरा राखून ठेवावा", अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :