Thames River : ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट, जलस्रोतांवर मोठा परिणाम, थेम्स नदीचे पात्रही कोरडे
सध्या ब्रिटनमध्ये उष्णतेचा कहर सुरु आहे. देशातील बहुतांश जलस्रोत आता कोरडे पडत आहेत. उष्णतेच्या लाटेचा थेम्स नदीवर देखील परिणाम झाला आहे.
Thames River : जागतिक तापमानवाढीचा (Global Warming) फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट (Heat wave) आली आहे. ब्रिटनलाही उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. सद्यस्थितीवर नजर टाकली तर ब्रिटनमध्ये उष्णतेचा कहर इतका सुरु आहे की, देशातील बहुतांश जलस्रोत आता कोरडे पडत आहेत. त्यात थेम्स नदीचाही (Thames River) समावेश होतो. ब्रिटनच्या हवामान संस्थेने पुन्हा एकदा देशात उष्णतेच्या इशारा दिला आहे.
सध्या ब्रिटनला विक्रमी उष्णतेचा सामना करावा लागत आहे. या वाढत्या उष्णतेचा जलस्रोतांवर परिणाम होताना दिसत आहे. सध्या अनेक ठिकाणी थेम्स नदीचे पात्र कोरडे पडले आहे. जगभरातील अनेक प्रमुख नद्यांपैकी थेम्स ही एक प्रमुख नदी मानली जाते. याचा फटका इटलीला देखील बसला आहे. इतिहासात अशी स्थिती प्रथमच झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तसेच भविष्यवात उच्च तापमानाचा इशारा देखील तज्ज्ञांनी दिला आहे. इंग्लंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड तसेच स्कॉटलंडच्या काही भागांसाठी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
सध्या ब्रिटनमध्ये कमी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. याचा मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे उष्णतेत मोठी वाढ होताना दिसत आहे. याचा परिणाम प्रमुख जलस्रोतांवर होत असल्याचे दिसत आहे. ब्रिटनच्या हवामान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 1935 नंतर हा जुलै महिना इंग्लंडसाठी सर्वात कोरडा होता. इथे सरासरी पाऊस 23.1 मिलीमीटर (0.9 इंच) होता. जो महिन्याच्या सरासरीच्या फक्त 35 टक्के होता.
जुलैमध्ये ब्रिटनमध्ये उष्णतेची तीव्र लाटे आली होती. याचा परिणाम थेम्स नदीवर देखील झाला आहे. ब्रिटनच्या प्रतिष्ठित नदीचा काही भाग सुकल्यानंतर थेम्सचा उगम दोन मैलांपेक्षा जास्त खाली गेला आहे. तसेच इटलीच्या पो नदीच्या पाण्याची पातळीत देखील मोठी घट झाली आहे. मागील 70 वर्षांतील देशातील सर्वात भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नदीची पाणी पातळी विक्रमी निचांकी पातळीवर पोहोचली आहे. इटलीत देखील गेल्या सात दशकांतील सर्वात गंभीर जलसंकट आल्याचे म्हटले जात आहे. ब्रिटनमध्ये 1935 नंतर जुलै महिना हा सर्वात उष्ण होता. जुलै महिन्यातील उष्णतेच्या लाटेत ब्रिटनचा वीजपुरवठा खंडित झाला होता. विमानतळाच्या धावपट्टीचे आणि रेल्वे रुळांचे नुकसान झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- COP 26 : जागतिक तापमानवाढ जगासाठी धोकादायक, विकसनशील देश अधिक प्रभावित: नरेंद्र मोदी
- मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, पुढील 3 वर्षात ग्रीन एनर्जीसाठी करणार 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक