Women Health : वाढत्या उष्णतेचा तुमच्या मासिक पाळीवर काय परिणाम होतो? स्त्रीरोग तज्ज्ञांकडून जाणून घ्या
Women Health : तुम्हाला माहिती आहे का? की उच्च तापमानामुळे तुमच्या मासिक पाळीवरही परिणाम होतो? हे असे का घडते? जाणून घ्या.
Women Health : मे महिना सुरू असल्याने देशासह राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस, तर काही भागात ऊन पाहायला मिळत आहे. अशा बदलत्या वातावरणाचा अनेकांच्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभाग तसेच डॉक्टरांनी केलंय. बदलत्या हवामानाचा परिणाम अनेक महिलांच्या आरोग्यावरही होताना दिसत आहे. तुम्हाला माहिती आहे का? की उच्च तापमानामुळे तुमच्या मासिक पाळीवरही परिणाम होतो? हे असे का घडते? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या.
उष्णतेमुळे लोक उष्माघात आणि डिहायड्रेशनचे बळी ठरतायत
संपूर्ण भारतात उष्णतेने कहर केला असतानाच उष्णतेच्या लाटेमुळे लोक उष्माघात आणि डिहायड्रेशनचे बळी ठरत आहेत, त्याचा परिणाम मासिक पाळीवरही होतो. उष्णतेमुळे महिलांच्या मासिक पाळीवर अनेकदा परिणाम होतो. असे का होते? असा प्रश्न तुमच्याही मनात असेल तर आम्ही या लेखात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहोत. याबाबत एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. याबाबत स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसूती तज्ज्ञ आणि IVF तज्ज्ञ डॉ. अर्चना धवन बजाज माहिती देत आहेत. जाणून घ्या..
वाढत्या उष्णतेचा तुमच्या मासिक पाळीवर काय परिणाम होतो?
स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्याच्या काळात तापमान खूप जास्त असते. उष्ण वाऱ्यामुळे शरीरात निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन होते आणि या डिहायड्रेशनमुळे पीरियड सायकलवर परिणाम होतो. हवामानातील बदल हार्मोन्सच्या नियमनावर परिणाम करतात. गरम वाऱ्याच्या वारंवार संपर्कात आल्याने हार्मोन्सवर परिणाम होतो. हार्मोन्समध्ये चढ-उतार होतात. यामुळे, उन्हाळ्याच्या हंगामात मासिक पाळीचे चक्र जास्त काळ टिकू शकते. हे फक्त तीन ते पाच दिवस होत असले तरी उन्हाळ्यात हे चक्र सात दिवसांपर्यंत वाढू शकते. याशिवाय उन्हाळ्यात तणाव जास्त असतो, त्यामुळे दैनंदिन कामावर परिणाम होतो आणि झोपेवरही परिणाम होतो. यामुळे हार्मोनल असंतुलन देखील होते, ज्यामुळे मासिक पाळीवर परिणाम होतो.
खाण्याच्या सवयींचाही परिणाम होतो
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या ऋतूमध्ये खाण्याच्या सवयींचाही पीरियडवर परिणाम होतो. अनेकदा आपण या ऋतूत आंबा, पपई, अननस भरपूर खातो. यामुळे पोटात उष्णता निर्माण होते, त्यामुळे ओटीपोटाच्या भागात उष्णता निर्माण होते. त्यामुळे गर्भाशय आकुंचन पावते. यामुळे, मासिक पाळी लवकर येऊ शकते. उष्णतेमुळे योनीमार्गात संसर्ग होण्याचाही धोका असतो.
उन्हाळ्यात मासिक पाळी असताना काय काळजी घ्यावी?
खूप पाणी प्या.
फळांचा रस प्या.
गरम फळे किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळा
तणावमुक्त राहण्यासाठी ध्यान आणि व्यायाम करा
पुरेशी झोप घ्या
हेही वाचा>>>
Women Health : महिलांनो टेन्शन कमी घ्या.. सतत तणावाखाली राहिल्यास पोट वाढते, कसे कमी कराल? जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )