एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Election 2024 : मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले

Maharashtra Assembly Election 2024 : भंडाऱ्याच्या मोहाडीत राष्ट्रवादीचे दोन गट आपापसात भिडल्याची घटना घडली. सुमारे अर्धा तास मतदान केंद्रावर गोंधळ सुरु होता.

भंडारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) 288 जागांसाठी आज मतदान (Voting) पार पडत आहे.  महायुती (Mahayuti), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि इतर पक्षांच्या एकूण 4136 उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. नाशिकमधील 15 विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून अनेक मतदारसंघात राडा झाल्याचे दिसून आले आहे. आता भंडाऱ्याच्या (Bhandara) मोहाडीत राष्ट्रवादीचे दोन गट आपापसात भिडल्याची घटना घडली आहे. 

नेमकं काय घडलं? 

तुमसर विधानसभेतील मोहाडी येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक विद्यालयाच्या मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते मतदान केंद्रावरचं आपापसात भिडलेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मतदारांना टाटा सुमोमध्ये बसवून थेट मतदान केंद्रात पोहचविले. यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला. यावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्कीही केली. सुमारे अर्धा तास मतदान केंद्रावर हा प्रकार सुरू होता. भंडारा पोलिसांनी वेळीचं दखल घेत हे प्रकरण शांत केले.  

आष्टी विधानसभा मतदारसंघात दोन गटात हाणामारी 

बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. परळी विधानसभा मतदारसंघ वगळता पाचही मतदार संघामध्ये सुरळीतपणे मतदान प्रक्रिया दुपारपर्यंत पार पडली. मात्र, याला अपवाद ठरले आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी गाव. भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार महबूब शेख यांच्या समर्थकांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली. यानंतर हे प्रकरणाचे रुपांतर थेट हाणामारीमध्ये झाले. सुरेश धस समर्थकांना महबूब शेख यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. 

नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली 

तर नांदगाव मतदारसंघात नोटांचं वाटप करणारी गाडी पकडल्याचा प्रकार घडला. साकोऱ्यात मतदारांना पैसे वाटप करणारी गाडी आल्याची माहिती अपक्ष उमेदवार डॉ. रोहन बोरसे यांच्या समर्थकांना मिळाली. गाडी अडवल्यानंतर ड्रायव्हर गाडी सोडून फरार झाला. यानंतर कार्यकर्त्यांनी हातात नोटा दाखवल्या. एका उत्साही कार्यकर्त्याने गाडीच्या टपावर उभं राहत नोटा फाडल्या. आता घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. गाडी कोणाची व पैसे कोणाचे आहेत? याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. आता हे पैसे नेमके कुणाचे निघणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा 

नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas on Walmik Karad : अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा
अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा
Mhada Lottery: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं?
Mamata Banerjee : बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
Datta Bharne on Dhananjay Munde : बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Koregaon Bhima Shaurya Din : कोरेगाव भीमामध्ये 207 वा शौर्यदिन,  5 हजार पोलिसांचा बंदोबस्तShegaon Gajanan Maharaj Mandir : नववर्षाचा उत्साह, शेगावमध्ये भाविकांची भल्या पहाटेपासूनच गर्दीTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 01 जानेवारी 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 01 जानेवारी 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas on Walmik Karad : अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा
अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा
Mhada Lottery: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं?
Mamata Banerjee : बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
Datta Bharne on Dhananjay Munde : बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10  लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10 लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
Walmik Karad:कॉलेजमध्ये शर्टच्या मागे गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून फिरणाऱ्या वाल्मिक कराडांनी 'राखे'तून भरारी कशी घेतली?
धनंजय मुंडेंचा उजवा हात, प्रति पालकमंत्रीपदाचं बिरुद, वाल्मिक कराड अण्णा एवढ्या उंचीवर कसे पोहोचले?
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
Walmik Karad: वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
Embed widget