Washim Assembly Election : वाशिममधील तीन लढतींकडे राज्याचं लक्ष, कोण मारणार बाजी?
Washim District Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीवेळी चर्चेत आलेल्या वाशिम जिल्ह्यात आता विधानसभेच्या निमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस दिसत आहे.
वाशिम : यंदाच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या अन् वाशिमध्ये अनेक जुने शत्रू मित्र झाले, तर काही मित्र एकमेकांचे शत्रू झाले. एकाच पक्षातील कधी काळी सोबत राहिलेले एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. वाशिमध्ये सध्या भाजपचे दोन तर काँग्रेसचा एक आमदार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकी वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे लखन मलिक निवडून आले होते. कारंजा विधानसभा मतदारसंघात भाजपचे राजेंद्र पाटणी तर रिसोड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अमित झनक निवडून आले होते.
जिल्हा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणेनंतर निर्माण झालेला जिल्हा. काही दशकांपूर्वी अकोला जिल्ह्यात असलेला वाशिम फक्त तालुका म्हणून ओळखला जायचा. मात्र वाशिम जिल्हा ब्रिटिशांच्या काळात सुद्धा जिल्हा असल्याचे पुरावे मिळतात. जिल्ह्याला पुन्हा वैभवशाली जिल्ह्याची ओळख मिळाली ती 1995 मध्ये राज्यात आलेल्या युती सरकारमुळे. बाळासाहेब ठाकरे यांनी 1997-98 मध्ये रिसोड शहरातील एका सभेत घोषणा केली की अकोला जिल्हा नाव खोडा, वाशीम लिहा आणि काही महिन्यात वाशिम जिल्हा निर्माण झाला.
या जिल्ह्यात कधी काळी म्हणजे 2009 पर्यंत वाशिम, मेडशी, मंगरूळपीर कारंजा असे चार विधानसभा मतदारसंघ होते. तर वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघ होता. मात्र 2009 साली मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर वाशिम, रिसोड आणि कारंजा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले.
या तिन्ही मतदारसंघांचा विचार केला तर रिसोड विधानसभा मतदारसंघावर चार वेळा सलग काँग्रेसने आपला झेंडा अबाधित फडकवला आहे. तर वाशिम विधानसभा मतदारसंघावर भाजपने आपला झेंडा फडकवला.कारंजा मतदारसंघावर एक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोनवेळा भाजपने आपला झेंडा रोवला.
क्रमांक | विधानसभा मतदारसंघ | महायुती उमदेवार | महाविकास आघाडी | वंचित/अपक्ष/इतर | विजयी उमेदवार |
1 | वाशिम विधानसभा | शाम खोडे (भाजप) | डॉ. सिद्धार्थ देवळे (ठाकरे) | मेघा डोंगरे (वंचित) | |
2 | रिसोड विधानसभा | भावना गवळी (शिवसेना) | अमित झनक (काँग्रेस) | अनंतराव देशमुख (अपक्ष) | |
3 | कारंजा विधानसभा | ताई डहाके (भाजप) | ज्ञायक पाटणी (NCP-SP) | सुनील धाबेकर (वंचित) |
ही बातमी वाचा: