एक्स्प्लोर

समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरुच; वाशिममधल्या कारंजाजवळ अपघात, दोघांचा मृत्यू

Accident on Maharashtra Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरुच असून वाशिममधल्या कारंजाजवळ अपघात झाला असून अपघातात दोघांचा मृत्यू

Accident on Maharashtra Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg)  अपघातांचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. 10 जिल्हे आणि 26 तालुक्यांतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील (Washim District) कारंजाजवळ अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोनजण गंभीर जखमी आहेत. 

समृद्धी महामार्गावर वाशिममधल्या कारंजाजवळ भीषण अपघात झाला असून अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. मुंबईवरून (Mumbai News) नागपूरकडे (Nagpur) जात असताना वाशिमच्या कारंजानजीक समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना आज पहाटे दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान घडली. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आलं आहे. अपघात एवढा भीषण होता की, मृत मुलगी कारच्या बाहेर उडून समृद्धी हायवे रोडच्या बाजूला खाली 200 फूट अंतरावर जाऊन पडली होती. या अपघातातील सर्वजण नागपूरचे असून अपघाताचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. 

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीनं तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. अपघात अत्यंत भीषण असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये चारजण उपस्थित होते. त्यापैकी दोनजण जागीच ठार झाले असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, लोकार्पणसोहळ्यानंतर पहिल्यांदाच जीवितहानी झाल्याची माहिती मिलत आहे. तर लोकार्पणाआधीही दोन अपघात झाले आहेत, त्यात बुलढाण्यात चार मृत्यू झाले होते.

समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरुच; वाशिममधल्या  कारंजाजवळ अपघात, दोघांचा मृत्यू2022/12/28/f070ceb9a5e3c9c4988bfcf5e34e9919167219928532988_original.jpeg" width="675" height="506" />

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका

समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून त्यावर होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे. यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचा वेग अधिक असल्यानं अपघात होत असल्याचं समोर आलं आहे. अनेकदा गाडीचे टायर फुटल्याने देखील अपघात होत आहे. तर या महामार्गावर अचानक जनावरे समोर आल्याने त्यांना वाचवण्याच्या नादात देखील अपघात होत आहे. 

दुचाकींना बंदी असूनही महामार्गावर दुचाकींचा वावर

समृद्धी महामार्गावर दुचाकीस्वार यांना परवानगी देण्यात आलेली नाही. मोठ्या गाड्यांच्या वेग पाहता या महामार्गावर दुचाकी चालवण्यास बंदी आहे. मात्र असे असतांना देखील या महामार्गावर अनेक ठिकाणी दुचाकीस्वार प्रवास करतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे देखील अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. अचानक दुचाकी समोर आल्यावर वेगावर नियंत्रण मिळवणे अवघड होत असल्याची तक्रारी देखील समोर येत आहेत. 

दरम्यान, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना एकमेकांना जोडणारा महाकाय प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सहजरित्या आणि कमी वेळेत होणार असल्याचा दावा करण्यात आलं आहे. नागपूर (Nagpur)-मुंबई (Mumbai) दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 701 किलोमीटरच्या 'समृद्धी महामार्गाची' घोषणा विधानसभेत केली होती. प्रत्यक्षात राज्याच्या 10 जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania on Beed Case | SIT रद्द करून संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी ऑन कॅमेरा करा- दमानियाAvinash Naikwade Beed | भर पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अविनाश नाईकवाडेंना अश्रू अनावरABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 06 January 2025BMC Recycling Plant | BMC कडून टिकाऊ मोडतोड व्यवस्थापनासाठी दहिसरमध्ये रिसायकलिंग प्लांट सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Embed widget