एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pooja Khedkar : वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा खेडकरची ऑडीला लाल दिवा लावून 'मिजास', पण मॉक इंटरव्ह्यूत फक्त 'या' दोन प्रश्नांवर बत्ती झाली गुल! काय होते प्रश्न?

Pooja Khedkar : व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रेनी असलेल्या पूजा खेडकरला मॉक इंटरव्ह्यू पहा त्यांना महाराष्ट्राशी संबंधित दोन साध्या प्रश्नांची उत्तर देता आली नसल्याचे लक्षात येते. 

Pooja Khedkar : पुणे येथे कार्यरत असलेल्या अत्यंत वादग्रस्त आणि आलिशान लाईफस्टाईल आणि  कोट्यवधींच्या संपत्तीने चर्चेत आलेल्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची (Pooja Khedkar) मंगळवारी वाशिममध्ये उचलबांगडी करण्यात आली. पूजा अधिकाराचा गैरवापर केल्याच्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पूजा खेडकर आता 30 जुलै 2025 पर्यंत वाशिममध्ये तिच्या प्रशिक्षणाचा उर्वरित कालावधी पूर्ण करेल. पूजाचा खेडकरचा पुण्यातील पराक्रम एकेक करून उघडकीस येत असतानाच आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रेनी असलेल्या पूजा खेडकरला मॉक इंटरव्ह्यूत महाराष्ट्राशी संबंधित दोन साध्या प्रश्नांची उत्तर देता आली नसल्याचे लक्षात येते. 

मॉक इंटरव्ह्यूत फक्त 'या' दोन प्रश्नांवर बत्ती झाली गुल! 

मॉक इंटरव्ह्यूमध्ये बीडमध्ये महिलांच्या गर्भपिशवी का काढाव्या लागत आहेत? आणि महाराष्ट्राचं देशात सर्वाधिक GST कलेक्शन का आहे? या प्रश्नांची पूजाला देता आली नाहीत. बीडच्या प्रश्नाचे उत्तर पूजाला देताच आलं नाही, तर जीएसटीच्या प्रश्नावर अतिशय मोघम उत्तर पूजाने दिल्यानंतर मुलाखतकार सुद्धा आश्चर्यचकित झाल्याचे दिसून येते.  

कोण आहे पूजा खेडकर आणि काय आहे वाद? (Who is Pooja Khedkar and what is the controversy?) 

  • पूजा खेडकर 2022 बॅचची महाराष्ट्र केडरची IAS अधिकारी आहे. रिपोर्ट्सनुसार, तिने UPSC परीक्षेत 841 चा ऑल इंडिया रँक (AIR) मिळवली होती. 
  • पूजा खेडकरने खासगी ऑडीवर लाल-निळ्या दिव्याची दिवा आणि व्हीआयपी नंबर प्लेट असलेली तिची खासगी ऑडी कार वापरल्याने वाद निर्माण झाला होता.
  • आयएएसमध्ये प्रोबेशनरी अधिकाऱ्यांना नसलेल्या सुविधांचीही मागणी तिने केली. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे सादर केलेल्या अहवालानुसार, खेडकर यांनी 3 जून रोजी प्रशिक्षणार्थी म्हणून कामावर रुजू होण्यापूर्वीच तिला स्वतंत्र केबिन, कार, निवासी क्वार्टर आणि शिपाई देण्याची वारंवार मागणी केली होती. तिला सुविधा नाकारल्या गेल्या.
  • पूजाचे वडिल दिलीप खेडकर यांनी सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांनी सुद्धा प्रशासकीय बळाचा वापर करत प्रशिक्षणार्थी IAS लेकीच्या मागण्या पूर्ण झाल्याची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर दबाव आणला.
  • पूजावर पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाची पाटी काढून टाकल्याचा आरोपही करण्यात आला होता. पूजाला कार्यालय म्हणून अँटी-चेंबर वापरण्याची परवानगी दिली होती.

पूजाने नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बनावट अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रमाणपत्रे कथितपणे सादर केली, असे पीटीआयने वृत्त दिले आहे. तिने मानसिक आजाराचे प्रमाणपत्रही सादर केल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. एप्रिल 2022 मध्ये, तिला तिच्या अपंगत्व प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), दिल्ली येथे अहवाल देण्यास सांगण्यात आले, परंतु कोविड संसर्गाचा हवाला देऊन तिने तसे केले नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना भवनात शुकशुकाट, सागर बंगल्यावर आनंदाला भरती
विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना भवनात शुकशुकाट, सागर बंगल्यावर आनंदाला भरती
Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं,  प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना भवनात शुकशुकाट, सागर बंगल्यावर आनंदाला भरती
विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना भवनात शुकशुकाट, सागर बंगल्यावर आनंदाला भरती
Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं,  प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Embed widget