(Source: ECI/ABP News/ABP Majha)
National Anthem : आधी राष्ट्रप्रेम नंतर अंत्यविधी, वाशिममध्ये अंत्ययात्रा थांबवून सामूहिक राष्ट्रगीताचं गायन
पहिले राष्ट्रप्रेम, नंतर धार्मिक अंत्यविधी याची प्रचिती वाशिमच्या (Washim) मंगरुळपीर शहरातील बाहेती कुटुंबियाने दाखवून दिली.
National Anthem : पहिले राष्ट्रप्रेम, नंतर धार्मिक अंत्यविधी याची प्रचिती वाशिमच्या (Washim) मंगरुळपीर शहरातील बाहेती कुटुंबियाने दाखवून दिली. स्व. मोहीनीदेवी रामनारायण बाहेती यांचे वयाच्या 78 वर्षी काल निधन झाले होते. आज ठरल्याप्रमाणं अंत्यसंस्कार करणार होते. आज सकाळी साडेदहा वाजता अंत्यविधी ठेवण्यात आले होते. दरम्यान, सरकारकडून आज सकाळी 11 वजता सामुहिक राष्ट्रगीत (National Anthem) गायन करण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे बाहेती परिवार आणि राजस्थानी समाजाने अंत्यविधीची अंत्ययात्रा थांबवून शासनाच्या आदेशानुसार 11 वाजता राष्ट्रगीत म्हटले आहे.
राज्य सरकारने 17 ऑगस्ट 22 ला सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगान घ्यावे असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहानला वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील बाहेती परिवाराने अत्यंयात्रा थांबवून प्रतिसाद दिला आहे. यामुळं अंत्ययात्रेत असणाऱ्या नागरिकांनी आणि बाहेती परिवाराने अंत्ययात्रेतसुद्धा राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. दरम्यान त्यांच्या कृतीची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
स्व. मोहीनीदेवी रामनारायण बाहेती
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत झाले. सकाळी ठिक 11 वाजता हे सामुहिक राष्ट्रगीत झाले. यावेळी नागरिकांनी आहे त्या ठिकाणीहून उभं राहून राष्ट्रगीताचं गायन केलं. दरम्यान, यामध्ये सर्व नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभं राहून सहभागी व्हावं असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं होतं. त्याप्रमाणं राज्याच्या विविध भागात राष्ट्रगीताचे सामुहिक गायन करण्यात आलं.
यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं देशात 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव' (Azadi Ka Amrit Mahotsav) सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या 'स्वराज्य महोत्सवाचे' आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात आली. आज सकाळी 11 वाजता राज्यात सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन झालं. या राष्ट्रगीताच्या समूह गायनामध्ये राज्यातील सर्व अबाल-वृद्धांनी सहभाग घेतला. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, प्रशासनाने याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी असेही निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. दरम्यान, सरकारने सर्व विभाग, विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी सामूहिक राष्ट्रगीत गायन अनिवार्य केलं होतं. राष्ट्रगीतासाठी विद्यार्थ्यांना मोकळ्या मैदानात एकत्र येण्यास सांगण्यात आलं होतं.
महत्तावाच्या बातम्या: