Wardha News : वर्ध्यातील पवनगावात आढळले वाघाचे कुजलेले तुकडे, परिसरात खळबळ, वनविभाग अॅक्शन मोडवर
Wardha : ज्याप्रकारे वाघाच्या शरीराचे तुकडे आढळून आले आहेत, यावरून वाघाची शिकार झाल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे.
![Wardha News : वर्ध्यातील पवनगावात आढळले वाघाचे कुजलेले तुकडे, परिसरात खळबळ, वनविभाग अॅक्शन मोडवर Wardha News Decomposed pieces of tiger found in Pawangaon in Wardha Fear in area forest department on action mode Wardha News : वर्ध्यातील पवनगावात आढळले वाघाचे कुजलेले तुकडे, परिसरात खळबळ, वनविभाग अॅक्शन मोडवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/36510b16f2414ad2119e853fa15f2c8f1660325853359323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tiger News in Wardha : वर्ध्याच्या वनक्षेत्र कोरा शिवारातील पवनगाव परिसराच्या झुडपी जंगल परिसरातील नाल्यात पट्टेदार वाघाचे 14 तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 11 ऑगस्टला गुरुवारी सायंकाळी पवनगाव परिसरात काही गुराखी जनावरांना चरायला घेऊन गेला होता. तेव्हा त्याला दुर्गंधी येऊ लागली. दुर्गंधी बघून गुराख्याने आजूबाजूला पाहिलं. त्यानंतर त्याला चक्क वाघाच्या शरीराचा काही भाग दिसून आला. काही अवयव देखील आजूबाजूला आढळून आल्याने गुराख्याने वनविभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर तातडीने वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 14 तुकडे
वनविभागाच्या पथकाकडून शुक्रवारी सकाळपासून घटनेची सखोल चौकशी सुरू असताना परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वाघाच्या शरीराचे तब्बल 14 तुकडे आढळून आले आहेत. यात वाघ नर की मादी हे कळू शकलेले नाही. सर्व अवयव जमा करुन पाहणी केली असता पायाची नखे, तोंडाची मिशाचा भाग जबड्यासहित कापलेला असून खालील जबड्याचे 4 दात आढळून आले असून इतर दात बेपत्ता आहेत. यावरून वाघाची शिकार झाल्याचा संशय वर्तवण्यात येत असून ही शिकार 6 ते 7 दिवसांपूर्वी झाली असल्याचा अंदाजही वर्तविण्यात येत आहे.
वनविभागाकडून चौकशी सुरू
वाघाची शिकार करणाऱ्या आरोपींचा शोध वनविभागाकडून घेतला जात आहे. या घटनेत सखोल चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती देखील मिळली आहे. आढळून आलेले वाघाचे 14 तुकडे गोळा करुन त्याचे नमुने घेण्यात आले असून शवविच्छेदन करण्यात आले आहे. सदर नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून या घटनेत वनविभाग कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघाच्या अवयवाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याला अग्नी देऊन दहन करण्यात आले आहे. सध्या वनविभाग पुढील तपास करत आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)