एक्स्प्लोर

Wardha : निर्घृण खून करणाऱ्या तीन आरोपींना अटक, सेवाग्राम पोलिसांची कारवाई

Wardha Crime : लाकडी दांडा आणि काचेच्या बॉटलच्या सहाय्याने एका व्यक्तीचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

वर्धा: सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत काहीच दिवसांपूर्वी एक हत्त्येप्रकरणी तीन आरोपींना सेवाग्राम पोलिसांनी अखेर अटक केली आहे. सदरचे आरोपी फरार होते, पोलिसांनी आज त्यांना बेड्या ठोकल्या. 

फिर्यादी सिद्धार्थ दमडुजी थुल  (वय 58 वर्ष) हे घरी असतांना 6 जुलैला रात्री अंदाजे 10.30 वाजण्याच्या दरम्यान करंजी (भोगे) येथील माजी पोलीस पाटील धनराज बलवर यांनी फिर्यादीला फोनद्वारे माहिती दिली की, त्यांचा भाऊ अरुणकुमार थुल याला कोणीतरी अज्ञात इसमांनी त्याच्या डोक्यावर जबर मारहाण करून जिवानिशी ठार केले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी यांनी भाऊ अरुणकुमार थुल याच घरी जाऊन पाहिले असता, त्यांच्या भावाच्या घराच्या किचनचा दरवाजा उघडा दिसला आणि बेडरुमचा लाकडी दरवाजा तुटून खाली पडलेला दिसला. आतमध्ये जाऊन पाहीले असता, फिर्यादीचा भाऊ अरुण हा त्याच्या घरातील बेडरुमध्ये खाली रक्ताच्या थारोळयात पडलेला दिसला.
 
लाकडी दांडा आणि काचेच्या बॉटलने केली होती हत्या 
मृत अरुणच्या डोक्याला घातक वस्तूने जबर मारहाण केल्याने त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. त्याच्या बाजूला काचेच्या दारुच्या शिशीचे तुकडे आणि एक लाकडी दांडयाचा तुटलेला तुकडा बेडवर पडून असल्याचे दिसले होते. कोणीतरी अज्ञात इसमांनी अरुणकुमार थुल यांच्या घरात प्रवेश करून आणि बेडरूमचा लाकडी दरवाजा तोडून कोणत्या तरी अज्ञात कारणामुळे त्यांच्या डोक्यावर दारुची काचेची शिशी व लाकडी दांड्याने जबर मारहाण करुन जिवानिशी ठार केले. त्यामुळे पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या तीन आरोपींना सेवाग्राम पोलिसांनी केले अटक 
सदर गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तापसचक्रे फिरवून  त्यांनी आरोपी अजय सुनिल शेंडे (30 वर्ष), रोशन सुनिल शेंडे (28 वर्ष) आणि गौरव गोविंद कापटे (25 वर्ष)या तिघांना सेवाग्राममधून अटक केली.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे, पोलीस स्टेशन सेवाग्राम यांचे निर्देशाप्रमाणे उपनिरीक्षक राहुल ईटेकार, पो. हवा. हरिदास काकड, नापोशि. गजानन कठाणे, पोशि पवन झाडे, अभय ईगळे, नेमणूक पोलीस स्टेशन सेवाग्राम यांनी केली. तसेच सदर गुन्हा उघडकीस आणण्यास सायबर पथक यांनी सहकार्य  केले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kshitij Patwardhan : पडद्यामागचा सिंघम क्षितिज पटवर्धन याच्याशी खास गप्पाTop 25 : टॉप 25 न्यूज :  8 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaPrakash Ambedkar : ...तर ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल - प्रकाश आंबेडकरDevendra Fadnavis Security : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यावरून राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget