Wardha Crime : इन्स्टाग्राम स्टोरीवरुन वाद झाला अन् 17 वर्षीय तरुणाला जागेवर संपवलं
Wardha Crime : Wardha Crime : इन्स्टाग्राम स्टोरीवरुन वाद झाला अन् 17 वर्षीय तरुणाला जागेवर संपवलं

Wardha Crime : इन्स्टाग्रामवर ठेवलेल्या स्टोरीवरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला जात इन्स्टाग्राम वर स्टोरी का ठेवली? या कारणावरून इन्स्टाग्राम वर स्टोरी ठेवणाऱ्या तरुणाला चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली. हिमांशू चिमने हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी मानव जुमनाके याला ताब्यात घेण्यात आलंय.
अधिकची माहिती अशी की, हिंगणघाट येथील हिमांशू चिमने आणि मानव जुमनाके यांच्यात इन्स्टाग्राम वर स्टोरी ठेवल्यावरून वाद झाला. काही दिवसांपासून सुरू असलेला हा वाद मिटविण्यासाठी हिमांशू आपल्या मित्रांसह मानव जुमनाके याने बोलावलेल्या ठिकाणी पिंपळगाव येथे पोहचला. पण येथे वाद मिटण्याऐवजी हा वाद विकोपाला गेलाय. आरोपी मानव जुमनाके यांनी हिमांशू चिमने याला पकडून ठेवत अनिकेत जुमनाके याने हिमांशूच्या छातीवर व गळ्यावर वार केले, यात सतरा वर्षीय हिमांशूचा मृत्यू झाला आहेय. यापूर्वी देखील हिमांशू आणि अनिकेत यांच्यात वाद होत मारहाण करण्यात आली होती.
सांगलीत 4 वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करुन खून
सांगलीतील जत तालुक्यामधील करजगे गावामध्ये चार वर्षाच्या बालिकेचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. हा खून बलात्कार करून झाल्याचा दाट संशय असून पोस्टमार्टम रिपोर्टनंतर ते स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळळी-पुजारी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. संशयित आरोपी पांडुरंग कळळी - पुजारी हा बालिकेच्या घराशेजारी राहण्यास आहे. संबंधित बालिका गुरुवारी सकाळपासून बेपत्ता होती. नातेवाईकांनी शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. त्यामुळे बालिका बेपत्ता झाल्याबाबत गावात दवंडी पिटवून शोध सुरू करण्यात आला. बालिका बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस देखील गावात दाखल झाले. यावेळी शोध घेतला असता पांडुरंग कळळी - पुजारी हा संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून आले. त्याच्यावर संशय बळवल्याने त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता घरातील एका पत्र्याच्या पेटीमध्ये मृतावस्थेत संबंधित बालिका मिळून आली. पोलिसांनी पांडुरंग कळळी - पुजारी याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने बालिकेचा खून केल्याची कबुली दिलीय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

