एक्स्प्लोर

Amravati News : विदर्भात स्वातंत्र्य दिनाचा मंगळवार ठरला 'घात'वार, 24 तासांत 11 मृत्यू तर 16 जण जखमी

Vidarbha Accident : विदर्भात स्वातंत्र्य दिनाचा मंगळवार 'घात'वार ठरला. चोवीस तासात वेगवेगळ्या अपघातात 11 मृत्यू तर 16 जण जखमी झाले आहेत.

अमरावती : विदर्भात मंगळवार 'घात'वार ठरला. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विदर्भात चोवीस तासात विविध अपघातात 11 मृत्यू तर 16 जण जखमी झाले. अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर रात्री 1 वाजता पुन्हा भीषण अपघात झाला आहे. नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. झोप लागल्याने चालक आणि वाहकाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तळेगाव दशासर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. तर वर्धा जिल्ह्यात काल सायंकाळी 5 च्या सुमारास दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अमरावतीसह वर्ध्यातही अपघात

वर्ध्याच्या आष्टी येथे दुचाकीवर फिरायला जाणाऱ्या तिघांचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हे तिघेही अप्पर वर्धा धरण पहायला गेले होते. धरण पाहून दुचाकीने परत येत असताना आष्टी येथे रस्त्याच्या बॅरिकेटस वर दुचाकी धडकली, दुचाकीवरील दोघे तीस फूट लांब फेकले गेले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

बुलढाण्यात एसटीला अपघात

तिसरा अपघात बुलढाणा जिल्ह्यात झाला. सवणा ते चिखली एसटी बसचा अपघात आज सकाळी सात वाजेदरम्यान झाला. स्टिअरिंग रोड लोक झाल्याने गाडी पलटी झाली. या अपघातात दहा ते पंधरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये साधारण विद्यार्थ्यांसह 25 प्रवाशी प्रवास करत होते.

यवतमाळमध्ये चार जणांचा बुडून मृत्यू

यवतमाळच्या वणी तालुक्यात वर्धा नदीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी बुडून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे वास्तव्यास असलेले 5 तरुण जुनाड येथील वर्धा नदीच्या पुलावर बसले होते. त्यातील दोघांनी पोहण्यासाठी नदीत उड्या मारल्या मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही वाहून गेले. तर, दुसऱ्या घटनेत वणीच्या नायगाव येथे वर्धा नदीपत्रात पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे वाहून गेले. यातील एकाचा कोना शिवारात मृतदेह तर दुसऱ्याचा मृतदेह माजरीजवळ आढळून आला. 

गोंदियामध्ये तिघांचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील फिरायला गेलेल्या तिघांचा एका तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना छत्तीसगढ राज्यातील सोमणी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मनगट्टा गावात घडली आहे. मृतक तिघेही शिक्षक हे गोंदियात एका कोचिंग क्लास मध्ये शिकवत होते. तिन्ही मृतक नागपूर, भिलाई आणि उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या तिन्ही शिक्षकांच्या मृत्यूनंतर गोंदियात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
Share Market : सेन्सेक्स निफ्टी सुस्साट, शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, कारण समोर
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, ट्रम्प कनेक्शन समोर
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
Dharashiv : धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
Share Market : सेन्सेक्स निफ्टी सुस्साट, शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, कारण समोर
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, ट्रम्प कनेक्शन समोर
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
Dharashiv : धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
Raja Shivaji Movie: राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
Pahalgam Attack Adil Shah House Eknath Shinde: पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
Embed widget