एक्स्प्लोर
वर्ध्यात शेतीमालासाठी 'रुरल मॉल' उभारणार
वर्धा: शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून लवकरच वर्ध्यात 'रुरल मॉल' तयार करण्यात येणार आहे.
दलालांची साखळी भेदून शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी-विक्री होणार आहे.
या 'रुरल मॉल'मध्ये शेतमाल प्रक्रिया किंवा पॅकिंग करुनही विकला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळणार आहे.
शहरातील मुख्य बाजार पेठेलगतच्या पुरवठा विभागाचं गोडाऊन खंडर म्हणून पडलं होतं. याच खंडरचं रुपडं पालटत 'रुरल मॉल' तयार होत आहे.
ऑगस्ट महिन्यात हा मॉल सेवेत येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. वर्षातून एखाद्या वेळेस धान्य महोत्सव किंवा एखाद्या उपक्रमातून मिळणारी बाजार पेठ आता वर्षभर उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल अशी आशा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement