एक्स्प्लोर

Walmik Karad: वाल्मिक कराडचे ते दोन व्यक्ती विदेशात; सीआयडीकडे नवीन माहिती, गूढ आता उलघडणार?

Walmik Karad Santosh Deshmukh Murder Case Updates: गेल्या काही दिवासांआधी वाल्मिक कराडचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले होते.

Walmik Karad Santosh Deshmukh Murder Case Updates: वाल्मिक कराड (Walmik Karad) सध्या एसआयटीच्या कोठडीत आहे. एसटीच्या माध्यमातून बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची चौकशी सुरू असल्याने बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक तर विशेष पोलीस पथक या ठिकाणी तैनात केले आहे. खंडणी प्रकरणात सीआयडीची 14 दिवसांची कोठडी संपल्यानंतर कराड एसआयटीच्या ताब्यात असून सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. याच पार्श्वभूमीवर सध्या बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर बंदोबस्त वाढविण्यात आला असून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची नोंद केली जाते आहे. याचदरम्यान एक नवीन माहिती समोर आली आहे. 

गेल्या काही दिवासांआधी वाल्मिक कराडचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले होते. या जप्त केलेल्या मोबाईलमधील काही सिमकार्ड विदेशात रजिस्टर असल्याची माहिती समोर आली होती. तसेच या सिमकार्डवरुन काहीजणांना फोनही गेल्याचे सांगितले जात होते. आता विदेशातून फोन करणारा व्यक्ती वाल्मिक कराडचाच नातेवाईक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाल्मिक कराडचा आर्थिक व्यवहार पाहणारा व्यक्ती देखील विदेशात जाऊन बसलाय, अशी सीआयडीकडे माहिती आहे. वाल्मिकची जवळच्या नातेवाईकाच्या नावे विदेशात गुंतवणूक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सीआयडीकडून कराडची विदेशात काही संपत्ती आहे का? याचा शोध सुरू आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता किरण पाटील करणार-

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीचे किरण पाटील करणार आहे. अनिल गुजर यांच्याकडील तपास आता किरण पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मकोका कायद्याअंतर्गत कारवाई झाल्यास त्या प्रकरणाचा तपास डीवायएसपी रॅंकच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येतो. आतापर्यंत या प्रकरणाचा तपास करणारे अनिल गुजर हे पोलीस निरिक्षक रॅंकचे अधिकारी आहेत‌ . त्यामुळे त्यांच्याकडील तपास डीवायएसपी अर्थात उप अधिक्षक रॅंक असलेल्या किरण पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणादरम्यान आरोपी वाल्मिक कराड इतर आरोपींच्या संपर्कात-

सुदर्शन घुले व त्याचे साथीदारांनी मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांच खून केला आहे. याकाळात सुदर्शन घुले, विष्णू चाटे व वाल्मीक कराड यांचे घटनेच्या अगोदर, नंतर का घटनेदरम्यान एकमेकांना कॉल असल्याचे सीडीआरवरुन दिसत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणादरम्यान आरोपी वाल्मिक कराड इतर आरोपींच्या संपर्कात असल्याचे सीडीआरवरुन दिसून येत आहे, असे मुद्दे एसआयटीने न्यायालयात मांडले. दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

विदेशातून फोन करणारा व्यक्ती वाल्मिक कराडचाच नातेवाईक, VIDEO:

संबंधित बातमी:

Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर; पोलिसांची त्या महिलेवर संशयाची सुई!

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Horoscope Today 19 August 2026: आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget