Virar Building Collapses Accident : लेकीचा पहिलाच वाढदिवस अन् त्याच दिवशी काळानं घात केला; विरारच्या इमारत दुर्घटनेत चिमुरडीसह आईचा दुर्दैवी अंत
Virar Building Collapses Accident : विरारच्या नारंगी फाटा येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची 4 मजली इमारतींचा मागील चौथ्या मजल्याचा एक भाग कोसळला आहे. यात अद्याप तीन जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे.

Virar Building Collapses Accident : राज्यासह देशभरात आज गणेशोत्सवाची (Ganesh Utsav 2025) लगबग आणि धामधूम सुरु असताना विरारच्या नारंगी फाटा येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. ज्यामध्ये रामू कंम्पाऊडच्या स्वामी समर्थनगर येथील रमाबाई अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्याचा एक भाग कोसळला आहे. यात अद्याप तीन जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. तर वसईचे आमदार स्नेहा दुबे-पंडीत यांच्या म्हणण्यानुसार इमारतीत 20 ते 25 जण अद्याप अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील आई आणि लेकीचा दुर्दैवी अंत झाला आहे. महत्वाचे म्हणजे चिमुकलीच्या पहिल्या वाढदिवच्या दिवशीच कुटुंबावर काळाने घाला घातलाय. तर वडील अद्याप मलब्याखाली बेपत्ता आहे.
दुर्घटनेत चिमुरडीसह आईचा दुर्दैवी अंत, वडीलही मलब्याखाली दबल्याची भीती
मिळलेल्या माहितीनुसार, या इमारतीत जोयल कुटुंबातील एक वर्षीय चिमुरडीचा पहिलाच वाढदिवस होता. त्यानिनित्त परिसरातील आणि मित्र परिवार घरी आला होता. या दुर्घटनेत या चिमुरडीचा वाढदिवसाच्या दिवशीच तिचा यात दुर्दैवी मृत्यू झालाय. तर तिच्या आईचा ही यात मृत्यू झाला आहे. तर वडील ओमकार जोयल हे सध्या मिसिंग आहे. ते या मलब्यात दाबल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून सध्या सध्या घटनास्थळी एन.डी.आर.एफ. टिम आणि वसई विरार शहर महापालिकेची अग्निशमन दलाची टिम रेस्क्यूच काम करत आहे. आतापर्यंत 9 जणांना रेस्क्यू करुन, त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मलब्यात अडकलेल्या नागरिकांची माहीती मिळावी यासाठी डॅागस्कॅाट आणण्यात आला आहे. त्याद्वारे ही सर्च ॲापरेशन सुरु आहे. दरम्यान, याच इमारतीतील चौथ्या मजल्यावर राहणारे सचिन निवळकर (वय 44), बायको सुपरीला निवळकर (वय 40), मुलगा अर्णव निवळकर (वय 14) हे सर्व मिसिंग असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, सध्या घटनास्थळी एन.डी.आर.एफ. टिम आणि वसई विरार शहर महापालिकेची अग्निशमन दलाची टिम रेस्क्यूच काम करत आहे. आतापर्यंत 9 जणांना रेस्क्यू करुन, त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मलब्यात अडकलेल्या नागरिकांची माहीती मिळावी यासाठी डॅागस्कॅाट आणण्यात आला आहे. त्याद्वारे ही सर्च ॲापरेशन सुरु आहे.
अपघाताबाबत अतिरिक्त आयुक्त दिपक सावंत यांनी दिलेली माहीती
संजीवनी हॉस्पिटल : जखमी
1.संजय स्वपन सिंग
2.मिताली राजेश परमार
यांना मुंबईच्या खार रोड येथील रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे.
प्रकृती हॉस्पिटल बोलिंज : जखमी
1.प्रदीप कदम
2.जयश्री कदम
3.विशाखा जोयेल.
4.मंथन शिंदे
5. आरोही ओंकार जोयल (वय 24 ) - ही मयत झाली आहे.
सिद्धिविनायक हॉस्पिटल नालासोपारा : जखमी
प्रभाकर शिंदे
प्रमिला प्रभाकर शिंदे
प्रेरणा प्रभाकर शिंदे
जीवदानी हॉस्पिटल चंदनसर
उत्कर्षां ओंकार जोयल (वय 1 वर्ष) ही मयत झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या






















