मुलीच्या अफेअरवर अखेर श्वेता तिवारी बोललीच, पलकच्या 'त्या' अफेअर्सचा विषय निघताच म्हणाली, ती प्रत्येक मुलाला डेट...
पलक तिवारी इब्राहीम अली खानला डेट करत असल्याचे म्हटले जाते. यावरच आता तिची आई श्वेता तिवारीने प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : बॉलिवुड हे असे क्षेत्र आहे, ज्यात अभिनेता, अभिनेत्रींच्या वैयक्तिक आयुष्याची नेहमीच चर्चा रंगलेली असते. एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री नेमकं कोणाला डेट करत आहे? कोण कोणाच्या प्रेमात पडलंय? असे प्रश्न नेहमीच विचारले जातात. या प्रश्नांच्या उत्सुकतेपोटी अनेकवेळा कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात वेगवेगळ्या वावड्या उठतात. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी अशाच काहीशा कारणांमुळे चर्चेत आहे. ती सध्या इब्राहीम अली खानला डेट करत असल्याचं बोललं जातंय. याच पलक तिवारीच्या अफेअर्सच्या चर्चेवर तिची आई श्वेता तिवारीने अखेर मौन सोडलं आहे. तिने तिच्या मुलीच्या कथित प्रेमप्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय.
View this post on Instagram
मुलीच्या अफेअरच्या चर्चेवर श्वेता तिवारीने दिलं उत्तर
पलक तिवारी ही सैफ अली खानचा मुलगा इब्राहीम अली खानला डेट करत असल्याचं सांगितलं जातं. हे दोघेही एकमेकांसोबत अनेकवेळी स्पॉट झालेले आहेत. दोघांचे एकत्र असल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या चवीने शेअर केले जाता. यावरच आता श्वेता तिवारीने प्रतिक्रिया दिली आहे. मला अशा अफवांनी काहीही फरक पडत नाही. सोशल मीडियावर चालू असलेली ही वायफळ चर्चा माझ्यासाठी नवी नाही, असंदेखील श्वेता तिवारीने म्हटलंय.
माझी मुलगी प्रत्येक तिसऱ्या मुलाला डेट...
'सध्या सोशल मिडिया आणि सगळीकडे फिरत असलेल्या अफवांचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही. गेल्या काही वर्षात मला भरपूर साऱ्या गोष्टी समजल्या आहेत. लोकांची स्मरणशक्ती फक्त चार तासांपुरती असते. लोक त्यानंतर एखादी बतामी विसरून जातात. त्यामुळे चिंता का करावी? सध्या फिरत असलेल्या अफवांनुसार माझी मुलगी प्रत्येक तिसऱ्या मुलाला डेट करत आहे. याच अफवांबाबत बोलायचं झालं तर मी एकूण तीन वेळा लग्न केल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे अशा अफवांचा आता माझ्यावर परिणाम होत नाहीये. याआधी सोशल मिडिया नव्हती. त्या काळात एखाद्या पत्रकाराने माझ्याविषयी नकारात्मक काही लिहिले की मला वाईट वाटायचे. आता मात्र तशी स्थिती नाही. अभिनेते-अभिनेत्रींसदर्भातील नकारात्मक गोष्टी विकता येतात. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांचा माझ्यावर परिणाम पडत नाही,' असं स्पष्टीकरण श्वेता तिवारीने दिलं आहे.
View this post on Instagram
पलक तिवारीने दिलं होतं स्पष्टीकरण....
दरम्यान, पलक तिवारी आणि इब्राहीम अली खान हे एकमेकांना डेट करत असल्याचं सर्वप्रथम 2022 मध्ये समोर आलं होतं. हे दोघे तेव्हा एकत्र दिसले होते. मुंबईतील एका कॉन्सर्टमध्येही हे दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं सांगितलं जाऊ लागलं. दोघांच्या याच कथित अफेअर्सच्या चर्चेवर पलक तिवारीने याआधीच स्पष्टीकरण दिलेलं आहे. आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहोत. इब्राहीम खूप चांगला मुलगा आहे. आमच्यात कधी-कधी बोलणं होतं. त्यापलीकडे काहीही नाही, असं पलक तिवारीने सांगितलं होतं.
पलक तिवारीच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर ती सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात दिसली होती. सध्यातरी पलक तिवारी कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टवर काम करत नाहीये.
हेही वाचा :