एक्स्प्लोर

Vidarbha Weather Update : विश्रांतीनंतर विदर्भात पुन्हा पावसाची उसंत; पुढील 3 दिवस धुव्वाधार पाऊस बरसणार; IMDचा अंदाज काय?

Vidarbha Weather Update : भारतीय हवामान खात्याने (IMD forecast) नागपूर जिल्ह्यात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये काहो ठिकाणी वादळीवारा तसेच मेघगर्जना आणि पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.

Vidarbha Weather Update : नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने (IMD forecast) नागपूर जिल्ह्यात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये काहो ठिकाणी वादळीवारा तसेच मेघगर्जना आणि पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. तर विदर्भातील (Vidarbha Rain Update) चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या गडगडाटसह हलका ते मध्यम पाऊस (Rain Update) होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील मोठे व मध्यम स्वरूपाचे धरणे जवळपास 70% भरलं आहे. तर लघु प्रकल्प जवळपास 75% भरलेले आहेत. तर दुसरीकडे नदी आणि नाले यांना अतिवृष्टीमुळे चांगले प्रवाह झाले आहे.

यवतमाळ जिल्ह्याला दोन दिवस ऑरेंज अलर्टचा इशारा

हवामान विभागाने 14 ऑगस्टपर्यंत यवतमाळ जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. या काळात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नदी नाल्या काठवरील नागरिकांनी सतर्तता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कपाशी सोयाबीन या पिकांसाठी हा पाऊस नव संजीवनी देणारा ठरत आहे.

अमरावती जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरवात; शेतकऱ्यांमध्ये उत्साहाच वातावरण

अमरावतीत गेल्या दहा-बारा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आज सकाळ पासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला. त्यानंतर मात्र 11.15 च्या दरम्यान जाेरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. पावसाने दांडी मारल्याने पिकांनी आपल्या मानाखाली टाकल्या होत्या, मात्र आज आलेल्या पावसामुळे पिकांनाही संजीवनी मिळाली आहे. 13 तारखे पासून हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाचे संकेतही दिले आहेत. तसेच नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे. जुलै अखेरपर्यंत सरासरीपेक्षा 21 टक्के अधिक असलेला पाऊस दहा-बारा दिवसाच्या खंडामुळे सरासरीच्या खाली गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचीही चिंता वाढली हाेती. मात्र या पावसाने शेतकऱ्याची चिंता मिटली आहे.

चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस, अनेक रस्ते जलमय

चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. या पावसामुळे चंद्रपूर शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहे. विशेषतः चंद्रपूर शहरातील पठाणपुरा, बिनबा गेट, जलनगर, भानापेठ आणि तुकूम यासारख्या भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. मुसळधार पाऊस आणि रस्त्यावर साचलेलं पाणी यामुळे वाहन चालकांना रस्त्यावरून वाट काढणे अतिशय जिकरीचं जात आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेलं आहे. विशेषत: शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना या पावसामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 60 टक्के पाऊस झाला असून अशा प्रकारच्या मुसळधार पावसाची गरज होती. विशेषत जिल्ह्यातील धरण भरण्यास या पावसामुळे मदत होणार आहे.

इतर महत्वाचा बातम्या

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget