Nagpur : 'या' अभ्यासक्रमांत मिळतोय निशुल्क प्रवेश, दोन महिन्यांचे अनिवासी प्रशिक्षण
कार्यशाळेत उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, उद्योग निवडीची प्रक्रिया, प्रकल्प अहवाल तयार करणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती, मार्केटिंग, बाजारपेठेची पाहणी, उद्योग व्यवस्थापन आदी प्रशिक्षण देण्यात येईल.
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था बार्टी पूणे पुरस्कृत 2 महिने कालावधीचा नि:शुल्क तांत्रिक अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कर्यक्रम अनुसूचित प्रवर्गातील युवक, युवतींसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगणाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण
ॲप्लीकेशन डाटा अँड अनालेसिस, अप्लाईड आर्टिफिशीयल इंटलेजंट विथ इंफोसिस ऑनरोबोटीक अँड आयओटी, कॉम्पुटींग सर्व्हिस अँड सिस्टीम अडमिनिस्टेशन अँड बेसीक जापानीज, इनकुबेशन फॉर न्यु जनरेशन इन्टरप्रेनर स्टार्ट-अप या प्रशिक्षणाची माहिती देण्यासाठी महासंचालय बार्टी पूणे यांच्या अध्यक्षतेखाली व तांत्रिक व्याख्याते यांच्या मार्गदर्शनात 22 जुलै रोजी एक दिवसीय परिचय मेळावा सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात अनुसूचित प्रवर्गातील युवक युवतीसाठी उद्योजकता विकास व कौशल्य विकासामधून इंडस्ट्री-4 वर आधारित रोजगार व स्वयंरोजगार सुरु करण्याबाबत प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, विविध क्षेत्रातील उद्योग संधी, उद्योग निवडीची प्रक्रिया, प्रकल्प अहवाल तयार करणे, शासनाच्या विविध येाजनांची माहिती, मार्केटिंग, बाजारपेठेची पाहणी, उद्योग व्यवस्थापन आदी महत्वपूर्ण विषयावर अधिकारी व तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
येथे संपर्क साधा
सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षणानंतर स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरु करावा. त्याबरोबरच बार्टी व उद्योग विभागाकडून शासकीय योजनाचा लाभातून समाजाचे उद्योजीकरण करण्यास या प्रशिक्षणाचा लाभ होईल. प्रशिक्षणार्थ्यांनी सोबत येतांना आधार कार्ड, उच्च शैक्षणिक कागदपत्रे व दोन रंगीत छायाचित्र आणावीत, असे आवाहन एच.आर. वाघमारे केंद्र प्रमुख, प्रकल्प अधिकारी तथा राज्य समन्वयक बार्टी संपर्क क्रमांक 7774036232 व हिद्य गोडबोले प्रकल्प अधिकारी बार्टी कार्यालय, नागपूर यांनी केले आहे.
शिक्षक भरती MPSCमार्फत होणार? शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाकडे प्रस्ताव
PMC Recruitment 2022 : पुणे महापालिकेत 450 हून अधिक पदांसाठी भरती; आजपासूनच करा अर्ज, जाणून घ्या इतर तपशील
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI