GK: 'या' देशात दर सहा महिन्यांनी होते निवडणूक; वर्षातून दोनदा बदलतं सरकार
World Facts: युरोप खंडात असा एक देश आहे जिथे दर सहा महिन्यांनी निवडणूक होते, वर्षातून दोनदा राष्ट्राध्यक्ष बदलला जातो.
World Facts: भारत हा एक असा देश आहे जिथे वर्षभर कोणत्या ना कोणत्या ठिकाणी कसल्या तरी निवडणुका (Elections) होतच असतात. भारतात छोट्या-छोट्या पातळीवरील निवडणुका तर ठराविक काळानंतर होऊ घालतात, हेच भारतात (India) देश पातळीवरील निवडणुका या दर 5 वर्षांनी होतात. पण जगात असा एक देश आहे, जिथे दर 6 महिन्यांनी देश पातळीवरील निवडणुका (Elections) होतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे निवडणुका होताच तेथील राष्ट्राध्यक्ष बदलतो. तर आता या देशात दर 6 महिन्यांनी निवडणुका का बरं होतात? पाहूया...
नेमका कुठे आहे हा देश?
हा देश इतरत्र कुठे नसून तो युरोपात आहे. या युरोपियन देशाचं नाव सॅन मरिनो (San Marino) आहे. या देशात दर 6 महिन्यांनी निवडणुका होतात आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक निवडणुकीनंतर देशाचा प्रमुख बदलतो. जसं आपल्याकडे देशाच्या प्रमुखाला पंतप्रधान म्हणतात, तसं सॅन मरिनोमध्ये राष्ट्राध्यक्ष असतो.
जो कुणी नवा राष्ट्रप्रमुख निवडला जातो, त्याला तेथील लोक कॅप्टन-रीजेंट म्हणतात. ग्रेट आणि जनरल काऊन्सिलचे 60 सदस्य कॅप्टन रीजेंट निवडण्यासाठी मतदान करतात.
या देशाचा इतिहास काय?
वास्तविक, सॅन मरिनो देश हा जगातील सर्वात जुना लोकशाही असलेला देश आहे. येथील लोकसंख्या सुमारे 34 हजार आहे. सॅन मरिनो या देशातील पहिली निवडणूक 1243 साली झाली होती. येथील संसदेला 'अरांगो' म्हणतात. या देशात संविधान 1600 मध्ये लागू झालं. जेव्हा या देशात दर 6 महिन्यांनी निवडणुका होतात, तेव्हा देशाचा सर्वोच्च नेता म्हणून विरोधी पक्षनेत्याची देखील निवड केली जाते.
हा देश आकाराने खूप छोटा
सॅन मरिनो या देशाची गणना जगातील सर्वात लहान देशांमध्ये केली जाते. 61 चौरस किलोमीटरमध्ये वसलेला हा देश सर्वात लहान लोकशाही देशांपैकी एक आहे. हा देश इटलीच्या शेजारी आहे, यामुळेच इटलीची छाप तिथल्या संस्कृतीवर आणि भाषेवर दिसून येते.
सॅन मरिनो या देशामध्ये प्रामुख्याने इटालियन भाषा (Italian Language) बोलली जाते. तसेच येथील व्यापार आणि देशाच्या व्यवहारात सुद्धा याच भाषेचा वापर केला जातो. तसं तर या देशात जास्त तर कॅथलिक पंथाचे लोक राहतात, तरी बाकी इतर भाषेचा वापर पण या देशात केला जातो.
हेही वाचा: