World Cup 2023: सात वर्षांनंतर पाकिस्तानचा संघ भारतात; विमानतळावर जंगी स्वागत, व्हिडीओ व्हायरल
Pakistan Team Video: वर्ल्ड कपसाठी भारतात पोहोचलेल्या पाकिस्तानी टीमचं विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. स्वागतासाठी पाकिस्तानी टीमचे चाहते आधीच विमानतळावर पोहोचले होते.
Pakistan Team Video: आयसीसी वनडे वर्ल्ड कपची (World Cup 2023) सुरुवात 5 ऑक्टोबरपासून होत आहे. यंदाचा वर्ल्ड कप भारतात (India) होणार आहे आणि यासाठी विविध देशांच्या क्रिकेट टीम भारतात पोहोचत आहे. नुकतंच पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचं (Pakistan Cricket Team) देखील भारतात आगमन झालं आहे, यावेळी विमानतळावर पोहोचताच पाकिस्तानच्या टीमचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
स्वागतासाठी पाकिस्तानी टीमचे चाहते आधीच विमानतळावर पोहोचले होते. सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानी टीमच्या स्वागताचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय, ज्यात चाहते पाकिस्तानच्या टीमच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
हजारो चाहत्यांची विमानतळावर गर्दी
वर्ल्ड कपसाठी भारतात पोहोचलेल्या पाकिस्तानी टीमचं हैद्राबाद विमानतळावर (Hyderabad Airport) लँडिंग झालं. या दरम्यान, सर्व खेळाडू फॉर्मल कपड्यांमध्ये दिसून आले. विमानतळावर पाकिस्तानी टीम पोहोचणार असल्याची माहिती चाहत्यांना आधीच मिळाली होती, ज्यानंतर हजारोंच्या संख्येने चाहते विमानतळावर दाखल झाले. पाकिस्तानचे सुपरफॅन चाचा पण यावेळी विमानतळावर दिसून आले. बाबर आजमसह पाकिस्तानची संपूर्ण टीम विमानतळावर पोहोचताच 'पाकिस्तान जितेगा' अशी घोषणाबाजी सुरू झाली.
A warm welcome in Hyderabad as we land on Indian shores 👏#WeHaveWeWill | #CWC23 pic.twitter.com/poyWmFYIwK
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 27, 2023
पाकिस्तानी क्रिकेट टीमचं जोरदार स्वागत
पाकिस्तानी टीमचं स्वागत करण्यासाठी विमानतळावर दाखल झालेल्या हजारो लोकांनी हात हलवून आणि जोरदार घोषणाबाजी करुन पाकिस्तानी खेळाडूंचं स्वागत केलं. यानंतर बसच्या मार्गावर देखील पाकिस्तानी टीमचे चाहते स्वागतासाठी उभे असल्याचं दिसून आलं. जेव्हा पाकिस्तानची टीम हॉटेलवर पोहोचली, तेव्हा देखील तिथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. असं जल्लोषात स्वागत पाहून पाकिस्तानी खेळाडू देखील भारावून गेले. या ग्रँड वेलकमचा व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट टीमने देखील ट्विटरवर शेअर केला आहे.
वर्ल्ड कपदरम्यान, 14 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान पहिला सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) हा सामना रंगणार आहे, ज्यासाठी आधीच तिकीट बुकिंग सुरू झालं आहे.
Instagram story by Captain Babar Azam.
— Johns. (@CricCrazyJohns) September 28, 2023
- He has enjoyed the support from cricket fans in India. pic.twitter.com/nb39mOXhV1
हेही वाचा: