Indian Railway : चालत्या ट्रेनमध्ये ड्रायव्हरला हर्ट अटॅक आला तर काय? प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काय पर्याय?
Indian Railway : प्रवाशांच्या सुरक्षसाठी भारतीय रेल्वेकडून सर्व त्या उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी प्रत्येक गाडीच्या इंजिनमध्ये दक्षता नियंत्रण उपकरणे बसवली असतात.

मुंबई : जर लांब पल्ल्याचा प्रवास आणि तोही स्वस्तात करायचा असेल तर भारतीय रेल्वेशिवाय पर्याय नाही. रेल्वेचा प्रवास हा तुलनेने आरामदायी असतो. त्यामुळेच रेल्वेच्या प्रवासासाठी नेहमीच गर्दी असल्याचं दिसंतय. त्याचच भारतीय रेल्वे हळूहळू स्वतःला अपडेट करत असून वंदे भारत, नमो भारत सारख्या सेमी हायस्पीड ट्रेन या मार्गावर धावताना दिसतात. या गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेची (Indian Railway Security Rules) आणि सुविधांची पूर्ण काळजी घेतली जाते.
भारतीय रेल्वेत दररोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांसाठी रेल्वे दररोज हजारो गाड्या चालवते. अशा परिस्थितीत, रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व ती काळजी घेतली जाते. जर रेल्वेच्या चुकीमुळे एखादी दुर्घटना घडल्यास रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांना मोठी भरपाईही दिली जाते. अशा परिस्थितीत अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की, चालत्या ट्रेनमध्ये चालकाला हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला तर काय होईल? अशा स्थितीत रेल्वेचा संभाव्य अपघात कोणी रोखू शकतो का?
चालत्या ट्रेनमध्ये ड्रायव्हरला हर्ट अटॅक आला तर..
समजा तुम्ही ट्रेनने प्रवास करत आहात. ट्रेन पूर्ण वेगाने धावत आहे. यादरम्यान रेल्वे चालकाला हृदयविकाराचा झटका आला तर काय होईल? वास्तविक, अशी परिस्थिती टाळण्यासाठी रेल्वेने आधीच व्यवस्था केली आहे. ट्रेनमध्ये ड्रायव्हरसोबत एक सहाय्यक ड्रायव्हरही असतो. मुख्य चालकाला हृदयविकाराचा झटका आला किंवा कोणत्याही कारणास्तव ट्रेन चालवता आली नाही, तर सहाय्यक ड्रायव्हर ट्रेनचा ताबा घेतो आणि पुढच्या स्टेशनवर ट्रेन थांबवतो. त्यानंतर नियंत्रण कक्षाला त्याची माहिती दिली जाते.
सहाय्यक चालक आजारी असेल तर?
ट्रेनमधील ड्रायव्हर आणि सहाय्यक ड्रायव्हर दोघांनाही ट्रेन चालवता आली नाही तर काय होईल? अशी परिस्थिती टाळण्यासाठी रेल्वेने आपल्या सर्व गाड्यांच्या इंजिनमध्ये दक्षता नियंत्रण उपकरणे बसवली आहेत. कंट्रोल रूममधून या उपकरणाला सिग्नल दिले जातात.
सिग्नल दिल्यानंतर ट्रेन ड्रायव्हर आणि सहाय्यक ड्रायव्हरने प्रतिसाद न दिल्यास, ते अलार्म नोटिफिकेशन पाठवते. पुढील 17 सेकंदांपर्यंत त्याला चालकाने प्रतिसाद न दिल्यास, नियंत्रण कक्ष सक्रिय होतो आणि ट्रेनमध्ये स्वयंचलित ब्रेक लागतात आणि हळूहळू ट्रेन थांबते. त्यानंतर रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याची चौकशी केली जाते.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
