Viral Video : पिझ्झाप्रेमी तुम्हीही असाल, पण हा पिझ्झा तुम्ही कधी खाल्ला आहे का? व्हिडीओ एकदा पाहाच
Watermelon Pizza Viral Video : सोशल मीडियावर काही खाद्यपदार्थ असे असतात जे पाहून खाद्यप्रेमींचाही संताप होतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Watermelon Pizza Viral Video : खाद्यपदार्थांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) बऱ्याचदा व्हायरल होत असतात. खाद्यप्रेमी या व्हिडीओला चांगला प्रतिसादही देतात. मात्र, काही खाद्यपदार्थ असे असतात जे पाहून खाद्यप्रेमींचाही संताप होतो. आणि ते निराश होतात. सध्या असाच फळापासून बनवलेल्या अतरंगी पदार्थाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये चक्क हा माणूस कलिंगडालाच पिझ्झा (Watermelon Pizza) बनवतो आहे. अनेकदा आपण पिझ्झावर फळांचे, भाज्यांचे टॉपिंग केलेले पाहिले आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये पिझ्झा बनविण्यासाठीच कलिंगडाचा वापर केला जातोय. हा व्हिडीओ पाहून तुमचाही संताप झाल्याशिवाय राहणार नाही.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अनेकांच्या चर्चेचा विषय ठरतो. पिझ्झाप्रेमींनी तर या व्हिडीओवर पूर्णपणे नाराजी व्यक्त केली आहे. तशाप्रकारच्या कमेंट्सही व्हिडीओच्या खाली दिसतायत. तर अनेकांनी या पिझ्झाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.
कलिंगडाचा मूळ गुणधर्म हा ते एक फळ म्हणून खाण्यासाठी आहे. किंवा ज्यूस म्हणून पिण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मात्र, त्यापासून चक्क पिझ्झा बनवता येईल हा विचार कोणीच केला नसेल.
महत्वाच्या बातम्या :