Divorce Celebration: बायकोशी घटस्फोट घेतल्यावर आनंद गगनात मावेना, आईने दुधाचा अभिषेक घातला, '120 ग्रॅम सोनं अन् 18 लाख कॅश' मेसेज लिहलेला केक कापला
Divorce Celebration: सध्या सोशल मीडियावर अशाच एका युवकाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : लग्नात आनंदसोहळा साजरा करणे ही सामान्य गोष्ट (Viral Video Shows Man Celebrating Divorce With Milk Bath And Cake) असते, पण एखाद्याने तलाकाचं मोठं सेलिब्रेशन केलंय, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. सध्या सोशल मीडियावर अशाच एका युवकाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण आपल्या आईकडून दूधाने स्नान (अभिषेक) घेताना दिसतो आणि त्यानंतर ‘सुखी घटस्फोट’ असा लिहिलेला केक कापून जंगी सेलिब्रेशन करताना दिसतो.(Viral Video Shows Man Celebrating Divorce With Milk Bath And Cake)
या तरूणाच्या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे. काहींनी या कृतीवर टीका केली असली, तरी काहींनी युवकाच्या ‘नव्या सुरुवातीचा’ आनंद साजरा करण्याच्या पद्धतीचे कौतुकही केले आहे. व्हिडिओमध्ये दिसते की युवकाची आई त्याच्यावर दूध ओतून त्याचा अभिषेक करत आहे. हिंदू संस्कृतीत अभिषेक हा शुद्धीकरण आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक मानला जातो. त्यानंतर युवक ‘सुखी घटस्फोट’ असे लिहिलेल्या चॉकलेट केकजवळ येतो आणि हसतमुखाने तो केक कापतो. केकवरच त्याने लिहिले होते की, “मी माझ्या माजी पत्नीला १२० ग्रॅम सोने आणि १८ लाख रुपये दिले आहेत.” तसेच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, “कृपया आनंदी रहा, स्वतःचा सन्मान करा. १२० ग्रॅम सोने आणि १८ लाख रुपये दिले आहेत, घेतले नाहीत. आता मी सिंगल, खुश आणि आजाद आहे. माझं जीवन, माझे नियम!”
या व्हिडिओला मिळालेल्या संमिश्र प्रतिसादानंतर युवकाने तो पुन्हा शेअर करत आपल्या समर्थन करणाऱ्यांचे आभार मानले. जरी या व्हिडिओवर टीका आणि वेगवेगळ्या चर्चेचा पाऊस पडत असला, तरी त्यानेघटस्फोटानंतरही आयुष्य नव्या दृष्टीने कसं पाहता येऊ शकतं याबाबत एक वेगळा विचार नक्कीच पुढे आणला आहे.
View this post on Instagram
























