Viral Video : कडाक्याच्या थंडीत बर्फाच्या तलावात डुबकी मारणारी ती मुलगी कोण? बाहेर येताच घेतली कॉफी, नेटकरी थक्क!
Viral Video : आजकाल एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जिने उणे 27 अंश सेल्सिअस तापमानात चक्क बर्फाने गोठलेल्या तलावात डुबकी घेतली आहे. कोण आहे ती?
Viral Video : थंडी (Winter) पडायला लागली की लोकांकडे गरम पाण्याने अंघोळ करण्याशिवाय पर्याय नसतो. काहींना कडाक्याच्या थंडीतही थंड पाण्याने अंघोळ करायला आवडते, पण काहींना तर चक्क बर्फाळ तलावात डुबकी मारायला आवडते. आजकाल याच्याशी संबंधित एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही थरथर कापाल. हा व्हिडीओ एका मुलीचा आहे, जी उणे 27 अंश सेल्सिअस तापमानात बर्फाने गोठलेल्या तलावात डुबकी मारताना दिसत आहे.
Coffee for the coldpic.twitter.com/c0KgxVqfAh
— Lo+Viral (@TheBest_Viral) December 28, 2022
उणे 27 अंश सेल्सिअस तापमानात चक्क बर्फाने गोठलेल्या तलावात डुबकी
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की आजूबाजूला फक्त बर्फच बर्फ दिसत आहे आणि त्याच्या मध्यभागी एक अर्धा गोठलेला तलाव आहे, ज्यातून एक काळ्या रंगाचा स्विमिंग ड्रेस घातलेली मुलगी बाहेर येते. जशी ती निघते आणि कॉफीचा कप उचलून प्यायला लागते. यासोबतच तिथलं तापमान काय आहे, हेही ती तिच्या मोबाईलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. प्रत्यक्षात तेथील तापमान उणे 27 अंश सेल्सिअस होते. आता तुम्ही कल्पना करू शकता की, इतक्या प्रचंड थंडीत त्या मुलीने बर्फाळ तलावात कशी डुबकी मारली असेल? हा व्हिडीओ रशियाची राजधानी मॉस्कोच्या आसपासचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
बर्फाळ तलावात डुबकी घेणाऱ्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल
उणे 27 अंश सेल्सिअस तापमानात तुमच्यात बर्फाळ तलावात डुबकी घेण्याइतके धैर्य आहे का? तुमचे उत्तर कदाचित नाही असे असेल, अशा परिस्थितीत या मुलीच्या धाडसाचे कौतुक करावे लागेल. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @TheBest_Viral नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
अवघ्या 11 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 9 लाख 66 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 10 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने गंमतीने लिहिले आहे की, 'दीदी इतनी थंड में ओल्ड मंक पेयो', तर दुसऱ्या यूजरने 'ती अजून जिवंत आहे का?' असे लिहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Viral Video: नवरदेव गळ्यात हार घालणार तितक्यात नवरीनं केलं असं काही; व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले